हुश्य !
दिसली बुवा एकदाची ती धामण. गेले दोन-तीन दिवस झालेत. ब-याच जणांना दिसली. पण मला दिसतच नव्हती.
क्वारंटाईन फेजमधलं सुशेगात हिरण्य. धामणीने पण तिचा फिरायचा एरिया विस्तारीत केलाय. ४०° तापमानात शक्य तितकी गार आणि सुरक्षित जागा तिने शोधलीये. त्यामुळे हमखास त्याच परिसरात ती अनेकदा दिसली. मलाही आज तिथेच दिसली.
धामण.
एखाद्या रुंद मनगटासारखी गोलाकार जाडी आणि निदान बारा फूट लांब. माझी म्हणजे धोक्याची चाहूल लागताच ती फिक्कट तपकिरी पिवळ्या रंगाची चमकदार धामण सळसळत या टोकाची त्या टोकाला पोहंचली देखील. नजरबंद करणारी तीची नागमोडी चाल अक्षरशः जागच्याजागी खिळवून ठेवते.
तिच्या आसपास सुखनैव बागडणा-या मधमाश्या, फुलपाखरं, पक्षी, खारुटल्यांना न घाबरणारी धामण माणूस सदृश्य सावली जरी दिसली तरी घाबरुन पळ काढते, हे आपलं दुर्दैव.
No comments:
Post a Comment