Tuesday, 12 May 2020

6 #क्वारंटाईनएसाईडइफेक्ट्सऍन्डडिफ्रंटपर्स्पेक्टिव्ह

संध्याकाळी हिरण्य जवळच्याच पण खाजगी जागेतल्या चबुतरे कम् टुंबस जवळ फेरफटका मारला. अख्ख्या कुटुंबासोबत अडचणीतल्या, काटेरी, बार्बड् वायरच्या फेंसिंग मधून बसत, फरफटत फेरफटका मारणं मजेशीरच होतं.

एॅक्च्युअली खुल्ताबादचं जुनं नावं रत्नपूर होतं. आमच्या हिरण्यपासून खुलताबाद जेमतेम बारा किलोमीटर दूर आहे. तर या रत्नपूरला एकेकाळी सेमी प्रेशस स्टोन्सचे कारखाने होते. तसंही जिऑग्रिफीकली औरंगाबादच्या वरचा, खालचा आणि आसपासचा टापू ( इंदोर, बु-हानपूर, जळगाव, नाशिक, तेलंगणा, पुणे...)  तरत-हेच्या भुमीगत सेमी प्रेशस स्टोन्ससाठी, क्रिस्टल्ससाठी, एॅगॅट्ससाठी भारतात आणि जगभरात प्रसिद्ध आहे. 
औरंगाबादचा मॉस एॅगॅट आणि फिक्कट जांभूळका एॅमेथिस्ट तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हं..हं...तर आपण दगडांविषयी बोलत नाहीयेत. 

तर जूनं खरं मोठं गाव खुल्ताबाद होतं. या खुल्ताबादपासून दूरवर असा हा हिंदू-मुगल लष्कराची छावणी असलेला दौलताबादचा किल्ला आहे. पाच शतकांपूर्वी या दौलताबादच्या परिसरात फक्त लष्कर आणि संबंधीत गोष्टींच्या वसाहती होत्या, वावर होता. साहजिकच या परिसरात त्याकाळातील ब-याच कबरी दिसतात. 
आजचे हे घुमटाकार, जाळीदार खिडक्या, कमानदार प्रवेशद्वार असलेले तीन टुंब्स अशाच कोणी लष्करातील सरदारांचे असावेत. काहीही नावनिशाण इथे दिसत नाही. पण मुस्लिमपध्दतीचे कोरीव चिरे मात्र आहेत. कुणाचेही टुंब्स का असेनात, या घुमटाकार, अटकर इमारतींच जतन व्हायला हवं. या टुंब्सची सद्य परिस्थिती वाईट आहे. पतझड झाली आहे, तुडूंब काटेरी झाडोरा इस्तत: वारेमाप वाढून जनावरांच विसाव्याचं सुयोग्य ठिकाण होऊन ही जागा, हे टुंब्स अजूनच निर्वासित होताहेत. यांची दशा बघून मन चुटपुटलं. 
असो.
 
पण कुटुंबाबरोबरचा डोंगरातला संध्याकाळचा फेरफटका मनाला तजेला नक्कीच देऊन गेला.

No comments:

Post a Comment