Experiencing the great capacity of humans of finding or creating a comfort zone for themselves in any situation or condition.
सकाळचा फेरफटका आणि तुळशीयुक्त चहा घेऊन उत्साहाने हिरण्यचं किचन ताब्यात घेतलंय.
बारीक बारीक चिरुन फ्लॉवरची भाजी फोडणीला टाकलीये. आणि कांदा कैरी चटणी करायला घेतलीये.
शेजारीच मोबाईलवर अबिदा परवीन आर्त स्वरात गातीये.
मन..लागो...यार, फकिरीमें....
कांदा चिरताना डोळे भरुन भरुन येताहेत. कालच्या पावसासारख्याच उन्मुक्तपणे धारा लागल्याहेत.
हा कशाचा परिणाम आहे ?
कांदा खरंच का इतका तिखट आहे ?
का अबिदा कातर काळजाला हात घालतीये ?
का आपण वयाप्रमाणे हळवे झालोत ?
का तिखट कांदा, अबिदामार्फतच्या कबीराच्या मनस्वी हाका, कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा आणि एकुणच पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या ताज्या दृष्टांताचा हा एकत्रित परिणाम आहे ?
No comments:
Post a Comment