Thursday, 12 December 2019

RYEanecdotes. December'19

...चल तुला दडपे पोहे शिकवते. म्हणजे मी करते, तु मदत कर.
लेटिशिया कडून मिरची कांदा कापून घेतला. तो पर्यंत मी तिळ, डाळं, शेंगदाण्याची फोडणी तयार केली आणि परतलेल्या पोह्यांवर कांदा, कोथिंबीर, मीठ, साखर आणि ती फोडणी ओतली. 
...आता लिंबू पिळ त्यावर आणि लगेच चमच्याने कालव. हात नको लावूस हं. फोडणी गरम आहे. आणि अशी लिंबाची सालं लगेच कच-यात फेकायची नाही. We Indians love lemon, and generally we don't throw their peels like this. We use these peels to clean our copper-brass pots. Or we dry those peels in sun light and then powder it and use it as a body scrub. In summer I use these peels to clean my face, neck, elbows. 
Oh, really. I love such hacks.
...Hacks म्हणजे काय गं ?
Means to use something to it's utmost usefulness.
...चल तु आता चमच्याने पोहे कालव या लिंबाच्या सालींनी मी माझी चहाची तांबं पितळीची लाडकी भांडी चकाचक करते.
लेटिशिया नाजूकपणे चमच्याने पोहे कालवेपर्यंत मी लिंबाच्या साली आणि मीठानी माझे चहाचे 'तीन अनमोल रतन' झक्क चमकवले. 
चमच्याने वरवर कालवलेले पोहे काही मजा येईना.
...थांब मी जरा हाताने कालवते पोहे. 
झकास पैकी एकजीवपणे हाताने कालवले पोहे. 
मीठ साखर चेक केलं आणि खायला बसलो.
You know Aai, we don't prefer to use hands like this. It's considered very disrespectful.
...Really ? But this happens with all the RYEs. We Indians are very perticular about using our hands since childhood. That's why Indian surgeons are considered very skillful.
Yess...And you Indians use both the hands. After coming to India I started to using my left hand to pickup my mobile. But I love to eat with hands. It's very easy and practical. I have told my (Brazilian) family that now I am eating with my hands and loving it. And I am going to continue to eat with hands when I am back. So be ready for it. In Brazil it's compulsory to eat with spoons and knives. For chiken and sort of stuff we use only one hand. But we are not supposed to pick up chiken piece with both the hands. It is considered bad manners. I find these rules very boring. 

भारतीयांच हाताने लिलया जेवणं, भात कालवणं बहुतांश पाश्चिमात्यांना चकीत करतं. व्यक्तीपरत्वे बरेच जणं त्याचं कौतुक करतात. तसं जेवायला शिकतातही. पण काही जणं नाही म्हणजे नाहीच जेवत वा जेऊ शकत हातांनी. They associat this as a dirty thing. 
पण एक्स्चेंजमधली मुलं जास्त सजगपणे या व यासारख्याच भिन्न समजुतींकडे बघू शकतात. 
हा ग्लोबल डोळस समजुतदारपणा येण्यासाठीच हा रोटरी युथ एक्स्चेंजचा प्रोग्राम आहे.

#RYEanecdots

No comments:

Post a Comment