औरंगाबाद शहरातला एकेकाळचा गजबजता मॉडर्न बाजार.
पुर्वी मेन दुकानांच्या समोरच्या व्हरांड्यात आतील दुकानाला पुरक होणारे कारागिर बाळगले जात, ठेवले जात. भांडी बाजारात गेलं की नावं घालून देणारे बसलेले असतं. सोनाराकडे गेलं की बाहेर पटवारी बसलेले दिसत. दारुच्या दुकानासमोर चणे फुटाणे विकणारे अजूनही असतातच. तसंच रेडिमेड कपड्यांच्या दुकानासमोर असे झटपट अल्टरेशन्स करुन देणारे टेलर्स बसलेले असतात.
हल्लीच्या मॉल आणि ऑनलाईन खरेदीच्या जमान्यात ही पुरक पण नेमकं काम करुन देणारी मंडळी जरा कमीच होत चालली आहेत.
तरीपण काल बाजारात एका दुकानाच्या वरच्या मजल्यावर हे खटखट सटीकपणे चालणारं शिवणाचं मशिन पाहून छान वाटलं. हे मशिन चालवणारा नक्कीच टापटीपीचा असणार. जिन्सच्या तुकड्यांमधून तयार केलेली पिशवी तिही नेटकेपणाने मशिनला बांधून ठेवलेली. कात्री देखील इकडेतिकडे जाऊ नये म्हणून तिलाही भक्कम बांधीव बंधनात ठेवलेलं.
डुगडुगणा-या मशिनला जिन्सच्या कपड्याचा टोका. कपड्यांची चटरफटर कतरे टाकायला पुठ्ठ्याचा डब्बा. किती निटसपणे सगळं ठेवलयं. डोकं वापरुन जरुरीपुरत्या सोई करुन घेतल्या आहेत. चकाचक दुकानातला हाच कोपरा मनात घर करुन गेला.
Marcos..Do you have tailors like this in your country ?
Yes we have machines at home. My mom, my aunts, my grandmother everyone has machine at home. My grandma used to stich a lot many things till she was physically fit. Nowadays my mother doesn't use it as she is very busy. But my aunts stitch many things like table cloths, table runners, they alter readymade cloths also etc. In Brazil many homes have machines. It's very common.
चला ऐकूनच छान वाटलं. कोण, कुठे आणि कसं कनेक्ट होईल सांगता येत नाही.
World is small and beautiful also !!
♥️😍
No comments:
Post a Comment