Wednesday, 30 October 2019

निरागस विश्वास

कुणाचे अपघात, कुणाची जीवघेणी दुखणी, कुणाचे साधे वाटणारे पण अचानकच अघटीत वळण घेणारे आजार..वा इतर काही व्याधींविषयी ऐकलं तरी ते आपल्या उंबरठ्याबाहेर आहे याची एक आश्वस्त जाणीव कायम मनात असते. 
मला काही आजार, दुखणं होणार नाहीची एक जबरदस्त मानसिक लक्ष्मण रेषा बिनघोर झोप घेऊ देते. पण एकदा का या लक्ष्मणरेषेला पार करुन काही आरोग्यविषयक झटके खाल्ले की, नंतर मात्र शारिरीक, मानसिक स्वास्थ्य कितीही आलबेल झालं तरी त्या लक्ष्मणरेषे अलिकडच्या निश्चिंत सीतेसारखं निरागस विश्वासात रमणं पुन्हा कठीण आणि अशक्यही होतं.

No comments:

Post a Comment