कुठलाही प्रसंग, अनुभव तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुमच्याकडून काहीतरी घेऊन जातो.
आयुष्यभर ही आपल्याला समृद्ध करणारी लेनदेन चालूच असते.
बालपणी आपण एकूणच जगण्याविषयी अनभिज्ञ असतो. तरुणपणी बेफिकीर असतो. नंतरच्या टप्प्यावर तर जगण्याचा व्याप, गुंता आणि रेटा इतका वाढलेला असतो की आला क्षण शिंगावर घ्यायचा आणि निभवायचा एवढंच आपण करु शकतो वा करतो.
पण पन्नाशी पुढे मात्र जरा सजगपणे आपण जगायला शिकतो. कुठलीही कृती करताना वा विचार आत्मसात करताना जरा स्वत:ला प्रश्न विचारुनच काही पावलं टाकायला लागतो. जरा वेगळ्या पाऊलवाटा प्रयत्नपुर्वक धुंडाळायला लागतो. त्यातले धोके समजून उमजून पत्करतो. वेळप्रसंगी त्यावरही मात करतो.
नसता at least I tried म्हणून स्वत:चीच पाठ थोपटून घेत मार्गक्रमण करतो.
ख-या अर्थाने हा प्रवास मानवी उन्नतीकडे होत असावा असा माझा कयास आहे. तसा हा प्रवास कौटुंबिक चौकटी बाहेरचा असतो तरीही हवा हवासाच असतो.
Its deeply meaningful to explore life's possibilities individually.
पुन्हा एकदा चित्र प्रदर्शन.
आयोजकाच्या भुमिकेतली जबाबदारी आणि सहभागी चित्रकार म्हणूनचही दडपण.
परत तिच ती रडकथा, भयकथा.
जगरहाटीतली खंडीभर कामं आणि दुरुन वाकुल्या दाखवणारा कोरा कॅनव्हास आणि ठप्प झालेलं डोकं.
हातात वेळही नाही.
भराभर इंपिरियल कागद काढले त्याचे हाफ इंपिरियल केले. दणा दणा रंग काढले, रोलरने दबादबा थापले.
हा रंग, तो रंग, यात पिवळा, त्यात काळा,
ऊभा रोलर, आडवा रोलर, हलक्या हाताने, प्रेशरने सरसर रोलर्स फिरवले. मन-डोकं थांब म्हणेस्तवर आकार-उकार गिरवले, कागद फिरवले, वाळवले.
झटपट फ्रेमिंग करुन चित्र गॅलरीला सुपुर्त केले.
उद्या उद्घाटन.
हा हा म्हणता संध्याकाळी सगळे सहभागी चित्रकार पेंटिंग्ज घेऊन जमले. तुझी-माझी-त्यांची चित्र डिस्प्ले केली. एकमेकांची वाहवा केली.
रोलर्सने केलेल्या माझ्या चित्रांच एकजातपणे कौतुक झालं. गुरुस्थानी, मित्रस्थानी असलेल्या सर्व चित्रकारांनी अगदी उस्फुर्तपणे दाद दिली.
माझा डळमळलेला आत्मविश्वास स्थिरावला.
खरोखर मन फुलपाखरू झालं.
हे असे क्षण सप्तरंगी पंखांना बारा हत्तींच बळ देतात.
Thank you all for your generous and spontaneous appreciation. It means a lot to me.
Still long way to go.
All geared for it.
Cheers !!
No comments:
Post a Comment