Wednesday, 3 July 2019

वक्त वक्त की बात.

कदाचित शंभर वर्षांपुर्वी खूप पहाटे कोणाशी, म्हणजे शेजा-यांशी संपर्क साधायचा असेल तर शेजारचे उठलेत का नाही हे बघायला त्यांच्या घरातुन येणारा स्तोत्रांचा आवाज, उदबत्तीचा दरवळ वा विहिरीवरची हालचाल वा शेजारच्या काकू तुळशी वृंदावनला फे-या मारताना दिसल्या की हं, ते घर जागं झालं बरंका असं समजत असावेत.☺️

आमच्या लहानपणी एखाद्या घरातल्या स्वैपाक घरातून कुकरच्या शिट्ट्या ऐकू येणं, बैठक खोलीतला दिवा लागणं, रेडिओ सुरु होणं वा दुध आणायला कुणीतरी बाहेर पडणं हे असे ठोकताळे असायचे घर जागं झालं आहे हे समजायला.😊

पण हल्लीच्या काळातले ठोकताळे बरेच फसवे झालेत हो. मोबाईलने जग काय जवळ आलयं आणि जो तो निशाचरच झालायं.🙊🙉🙈
व्हाॅटसएॅपवर चेक केलं तर बरीच मंडळी ब्रह्मवेळेला पण ऑनलाईन दिसते तर लास्ट सीनची वेळ अगदी कधीचीही असू शकते. म्हणजे अजून झोपायचे आहेत का झोपून जागे झालेत कळायला मार्गच नसतो हो !🙄

पुर्वी अर्धमिटल्या डोळ्यांनी स्वप्न आठवत लोळणारी मंडळी हल्ली डोळे उघडले की मोबाईवरच सर्फिंग करत लोळत पडतात.🙃
मी म्हणते कसं कळणार सर्वसामान्यांना की तुम्ही झोपेतनं उठला आहात का ?  तुमचं घर जागं झालं आहे का म्हणून ?🤔

म्हणजे अस्मादिकांना म्हणजे फेसबुकवरच्या आमच्यासारख्या प्रथितयश लेखकांना हा धोका नाही.😌 कारण उठलं की आम्हाला काहीतरी सुचतंच.😔 खरं म्हणजे हा सुचलेल्या लिखाणाचा ढेकूण रात्रभर झोपूच देत नाही हो.😑 त्यामुळे उठलं की आधी ही शब्दांजली अर्पण करायची आणि अनासाये जगाला कळवायचं की तुम्हाला उजाडलंय म्हणून.🤪
आणि नाहीच कधी काही सुचलं (हो, होतं असं कधी कधी. सृजनशीलता अशी गिरणीतल्या पीठासारखी नसते. उजाडलं की भुरुभुरु पडायला☹️) की पॉप अप झालेल्या जुन्या पोस्टीलाच एक सुधारणेची उकळी आणायची आणि त्वरीत पोस्टायची.😀
लगेच तमाम जगताला कळतं की मॅडम उठल्या आणि कामाला पण लागल्या बरं म्हणून.😁

तर वक्त, वक्त की बात ऐसी रहती है !😬

No comments:

Post a Comment