Tuesday, 11 June 2019

असंच मंगळवारचं चिंतन.

खरंतर बॅंक म्हटली की अक्षरशः पायात गोळे येतात. नको वाटतं त्या बॅंकेत जायला. पण पैसा प्याराही आहे आणि लागतोही. तरी पण बॅंक म्हटलं की जीवावर येतं. काही म्हणा या बॅंकिंग मधलं काही कळत नाही, ना ही काही समजून घ्यायची इच्छा असते.
तरीसुद्धा या पहिल्या पावसाबरोबर अशा क्लिष्ट आणि तापदायक गोष्टींसाठी ठामेठोकपणे स्वावलंबी व्हायची सुरसुरी हमखास येते बरंका.

तर सकाळीसच बाहेर पडले. नविन ड्रायव्हरचा पहिला दिवस. त्यामुळे चाणाक्षपणे कौटुंबिक चौकश्या करणं आणि रस्ते सांगणं चालू होतं. मी आपलं सतत डावं-उजवं सांगतेय तर हे गृहस्थ लेफ्ट-राईट म्हणून विचारताहेत.
शिक्षण किती ? दहावी नापास.
इंग्रजी वाचता येतं ? नाही मॅडम बिल्कुल नाही.
या रस्त्यांवरच्या दुकानांच्या पाट्या वाचता येताहेत का ?
नाही मॅडम. हिंदी-मराठी असेल तर कळतं. इंग्रजी अजिबात येत नाही.
जरासं धक्कादायकपणे दचकायला झालं.
या पाट्या, ते होर्डिंग्ज, हे फ्लेक्स किती सहजपणे आपण वाचतो आणि दखलही न घेता दृष्टी आड, बुध्दी आड  करतो.
Such kind of lame and insipid reading goes to our mind as unnoticeablly as the pure-impure blood runs through our body. पण असे कितीतरी असंख्य लोकं या शहरात, राज्यात, राष्ट्रात आहेत की they simply cannot connect with such essential but insignificant things.
फाडफाड इंग्लिश जरी नाही आलं तरी निदान पाट्या, पत्ते तरी वाचताच आले पाहिजेत. Otherwise जगणं कठीण होऊन जाईल.
मागे बसलेली मी आणि जेमतेम दिड फुटावर पुढे बसलेला कार चालक. केवढा फरक आहे त्याचा आणि माझा या रस्त्याशी कनेक्ट होण्यामधे.
Its a big handicap for him. May be he is not aware of its gravity.
मला तर ती त्याच्या माझ्या मधली खोल दरीच वाटली.

हे बघा माझ्याकडे हे तीन क्रेडिट डेबिट कार्ड आहेत. तुम्ही त्यातले फरक मला समजावून सांगा. अहो तीन तीन कार्ड कशाला पाहिजेत मला ? एक ठेवतो कुठलं तरी. कुठलं ठेवू सांगा ?
बॅंकेच्या गुबगुबीत सोफ्यावर बसून एका मध्यमवयीन गृहस्थाच्या या प्रश्नांना एक तरुण नवखा बॅंक कर्मचारी जमेल तशी उत्तर देत होता.
सर...या कार्डाचा सर्विस चार्ज वार्षिक ****आहे आणि या कार्डाचा मात्र **** मासिक चार्ज लागतो आणि लगेच कटही होतो. आणि हे तिसरं कार्ड फार जुनं दिसतय. याविषयी तुम्ही मॅडमला विचारा.
त्या मॅडमला ? नकोरे बाबा. तुला समजतंय तेवढं सांग. नसता राहू दे. त्या मॅडम म्हणजे डोक्याला ताप आहे. काय बोलतात त्यांचं त्यांनाच कळत नाही. समजून उमजून हातात हात घेत दोघंही हसले.
माझी दखल घेत चपापलेही.

ते कुणाविषयी बोलत होते मला कळलं नाही. पण माझं काम होईस्तोवर खुर्चीत बसून होते तर एका टेबलावरुन हा संवाद ऐकू येत होता.
हं...बोल गं. मग आजचं पक्कं आहे ना आपलं ? तु त्या दोघींना फोन कर मी या तिघींना सकाळीच परत आठवण दिली आहे. काय माहित अगं ? तिला म्हणे माझा राग आलाय. सगळ्या गोष्टी नव-याला विचारुन काय ठरवतेस असं मी म्हटल्यामुळे तिला माझाच राग आलाय. आता तुच तिला फोन कर. आणि त्या दोघी आणि ती काय म्हणतात तेही लवकर कळवं. माझी तयारी आहे. तुझंच बोलणं झालं की पक्क कर आणि कळव.
I am ready...hello.. hello...आणि ड्रेसकोड लक्षात आहे ना ? डार्क निळी साडी विथ कॉन्ट्रास्ट कलरची बॉर्डर. मी माझ्या भावाने मुलांच्या मुंजीत घेतलेली निळी विथ ऑरेंज काठ नेसणार आहे.
तू ?

No comments:

Post a Comment