सध्या 'पुरुष उवाच' तरुणाईच्या डोक्याला खुराकचे जुने दिवाळी अंक वाचणं चालू आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी विषेशत: पुरुषांमध्ये जाणीवजागृती करण्याचा भाग म्हणून हे फक्त वार्षिक अंक काढले जातात.
तर त्यातल्या एका अंकातली ही आवडलेली अत्यंत सरल आणि तरल कविता.
खरंतर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वत:लाच व्यक्त करायला पाहिजे. पण आज सोशल मिडियावरन शुभेच्छांचा इतका मारा सुरु आहे ना की बाळाच्या पहिल्या वाढदिवसाला जसं ते बालक भांबावून जातं तशीच काहीशी अवस्था झालीये. नको तो विषेश दिवस आणि नको ती साखरपेरणी असं मनापासून वाटतंय. तर या मनस्थितीत नाही काही सुचत तर काय करणारं ?
म्हणून ही दुस-याची कविता शेयर करत आहे.
अगदी मोजक्या शब्दात महिलांविषयी मार्मिकपणे लिहिणारा कवी आमच्याच ग्रामीण प्रांतातला आहे याचं विषेश कौतुक आहे.
बाई
बाई सजली की
ब-याच माना वळायला लागतात
घड्याळ्याच्या काट्यासारख्या
बाई भिजली की
बरेच देह जळायला लागतात उदबत्त्यांप्रमाणे
बाई आतुनही सजत असते
बाई आतुनही भिजत असते
याचीही नोंद घेतली जावी
एवढी सामान्य अपेक्षा असते बाईची
सजताना
आणि भिजताना
...विनायक पवार. गोकुंदा. किनवट
No comments:
Post a Comment