आज व्हॅलेंटाईन डे आहे. साधारणतः तरुणांनी म्हणजे(मुलाने मुलीला, मुलीने मुलाला) एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करण्याचा ऑफिशियल दिवस.
तसे तर ३६५ दिवसात कधीही किंवा रोजही तुम्ही प्रेम व्यक्त करु शकताच म्हणा पण आजचा दिवस जागतिकपणे ऑफिशियल असल्यामुळे सर्वत्रच जरा प्रेमळ आणि गुलबट हवामान-तापमान असतं.
तरुणांमध्ये तर या काळात भलतीच हलचल, घालमेल असते. साहजिकच आहे म्हणा.
पण मग हा सगळा माहौल बघून प्रौढांनाही गुदगुल्या होतात आणि त्यांचेही जीव नाही म्हटलं तरी आल्हाद होतात. अर्थात या वयात म्हणजे प्रेमरुपी लग्न झालेल्या, लग्न अनुभवलेल्या, लग्नाचे फायदे तोटे समजलेल्यांना सरसकटपणे एकमेकांविषयी (स्त्री-पुरुष)असं हुकमानी प्रेम भावना व्यक्त करण्यात हशील वाटणार नाही वा वाटत नसावं पण सच कहो तो माहौल ही इतना रुमानी होता है ना की थोडासा तो प्रेमरंग आपुन को भी लग ही जाता है.
जरुर नाही की स्त्री-पुरुषांनीच एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त करावं.
You can express your love for anything. Like music, adventure, human bonding, art...it can be anything.
Go out of your way and express it.
माझ्यापुरतं बोलायचं तर एवढ्यातच मुंबईला गेले होते. माझ्या बहिणीचा मुलगा, सून आणि पावणेदोन वर्षाचा नातू काही आठवड्यांसाठी अमेरिकेतून भारतात आले आहे. तर या बाळजीवाला पहिल्यांदा पहायला, भेटायला म्हणून गेले होते. पावणेदोन वर्षाच्या या लोभस बाळाच्या बाळलिलांनी जीवाला वेड तर लावलंच पण सगळ्यात कौतुक कुणाचं वाटलं असेल तर माझ्या बहिणीचं आणि तिच्या यजमानांच. एक आई म्हणून, आजी म्हणून माझ्या बहिणीचं तिच्या मुलाच्या प्रती, नातवाच्या प्रतीचं प्रेम तर ठाई ठाई जाणवत होतंच पण माझ्या मेव्हण्यांच तर मला फार कौतुक वाटतयं.
सहसा आपली स्वत:ची मुलं झाली की पुरुषमंडळी, वडील लोक नौकरी-धंद्यात इतकी गर्क असतात ना की बालकांबरोबर त्यांचा तसा काही संवाद होत नाही, एकमेकांना सातत्याने सहवास लाभत नाही. कौटुंबिक जबाबदारीचा रेटाच इतका असतो ना की आपल्याच मुलांच्या लोभस बाळलीला बघायला आपल्याला वेळ नसतो. पण नातवंडांच्या वेळेस काळ वेगळा असतो, तुम्ही वेगळे असता, तुमचा रोल वेगळा असतो. So you try your best to make up for that lost time. विषेशकरुन पुरुषांच्या बाबतीत हे प्रकर्षाने जाणवतं. त्यामुळे ही अशी बाळ नातवंड म्हणजे आजोबांच्या अक्षरशः काळजाचा ठेवा बनतात. त्या नातवंडांसाठी काय करु न काय नाही असं होतं या वयात.
It was so soulfully delightful to watch my Jijaji playing with his grandson. अक्षरश: कामधंदा विसरुन, वैयक्तिक दिनक्रमाला कात्रीलावून नातवाबरोबर मिनिट न मिनिट आनंदाने घालवणारा एक समजदार पुरुष, आजोबा बघणं या सारखं सुख नाही. नातवाच्या बरोबरीने लहान होऊन त्यांच्याबरोबर खेळणारे आजोबा-आजी घरोघर असावेत, नव्हे असायलाच पाहिजेत. खरंतर आपल्याही मुलांना आपण इतकाच वेळ देऊ शकलो तर चित्र फार वेगळं दिसेल. पण व्यावहारिक सिस्टिम मधे ते सहसा शक्य होत नाही.
आपल्याच वंशवेलीवरच्या फुलांबरोबर निरागसपणे डुलणारे, खिदळणारे, हुंदडणारे जेष्ठ पाहिले की रम्य ती मानवी कुटुंब व्यवस्था असं वाटतं, पटतं.
नातवंडे ही दुधावरच्या सायीसारखी असतात याचा आंखो देखा अनुभव मला इथे मिळाला.
मुंबईत गेलं की जमेल तेव्हा फोर्टला चक्कर असतेच. या वेळेस काळाघोडा फेस्टिवलचं निमित्त होतं.
पायी फिरताना साहजिकच स्ट्रिट बुक स्टॉलसकडे पाय वळले. आर्ट रिलेटेड दोन-तीन पुस्तकं घेतली. त्यात एक पिकासोचं घेतलं. सध्या नुसती चाळतीये ही पुस्तकं. पण पिकासोच्या पुस्तकातल्या या फोटोने लक्ष वेधून घेतले.
पिकासो म्हणजे एक जगद्विख्यात चित्रकार, शिल्पकार, त-हेवाईक माणूस. पिकासोची छापील चित्र तर पुष्कळच पाहिलीयेत तसेच त्याचे छापील फोटोही खूप पाहिले आहेत.
भेदक नजर, पक्का व्यवहारीपणा चेह-यावर, आडवा-रुंद बांधा, निब्रट हात-बोटं..एखाद्या मुरब्बी शस्त्र दलाला सारखा दिसतो पिकासो. त्यात त्याचे ते स्टुडियोत काम करतानाचे उघडेबंब फोटो.
हाफ पॅन्ट, वरच शरीर उघडं, स्टुडियोभर पेंटिंग्जचा, शिल्पांचा, रंगांचा, ब्रशेसचा आणि इतर साहित्याचा आडवा तिडवा पसारा, भरीसभर शेजारी एखादी करंट अफेयरवाली महिला.
अक्षरशः पैलवानगिरी करणा-या एखाद्या रांगट कबाडी गोडावूनधारक मालकासारखा दिसतो पिकासो त्याच्या बहुतेक फोटोंमधनं. पण हा फोटो पाहिला आणि थबकलेच.
आयला !
हा पिकासो आहे का जेम्स बॉण्ड ?
भलतीच कातिल इमेज आहे ही.
आडव्या बांध्याला शोभणारा सुट-बुट-टाय, निब्रट हातात जळती सिगार, एक हात खिशात, कोटाच्या खिशातून डोकावणारा शुभ्र रुमाल, केसांच स्टायलीश वळण, नजरेत सौम्य भाव, चेह-यावर मंद स्मित, स्वत:च्याच 'वुमन इन गार्डन' या नजाकती शिल्पाशेजारी रुबाबात उभा असलेला जंटलमन पिकासो.
सही में कातिलाना अंदाज.
दणादण मास्टरस्ट्रोक्सने भलेथोरले कॅनव्हासेस रंगवणारा हा थोर चित्रकार पिकासो आहे का कोणी युरोपियन डिप्लोमॅट आहे असा संभ्रम पडावा इतका हा देखणा फोटो आहे पिकासोचा.
So,
पिकासो...आज का दिन तुम्हारे नाम.
No comments:
Post a Comment