Friday, 1 February 2019

Egypt...21सुस्त पर्यटनखाते.

इजिप्तमध्ये मी पंधरा दिवस होते. इजिप्त हा देश तसा लहान असला तरी इथे भौगोलिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. अख्खा इजिप्त प्राचीन मिस्र संस्कृती अवषेशांनी भरलेला आहे. पण दुर्दैवाने ही संस्कृती आता नामशेष झाली आहे. आणि ही संस्कृती आहे अगदी भारतासारखीच. भरपूर देव, देवता, त्यांची मंदिरं, त्यांच्या पूजा, मिरवणुका, देवरुपातले प्राणी-पक्षी, चंद्र-सुर्य आणि राजवंशीय माणसं सुध्दा. साहजिकच त्याकाळातली नावं, एकमेकातले संबंध, पध्दती लक्षात ठेवता ठेवता नाकी नऊ येतात.

गेल्या अनेक शतकांपासून इजिप्तवर इस्लामचा पगडा आहे त्यामुळे अगदी गाईड जरी घेतला तरी या संस्कृतीबद्दल सांगताना एक दुरस्थ अंतर सांगणा-यामधे जाणवतंच जाणवतं.
But believe me, आम्ही जिथे कुठे फिरलो तिथे कुठेही आम्हाला छापील लिट्रेचर मिळालं नाही का एखादा सुटसुटीत मॅप मिळाला नाही.
इथे तिकीटाबरोबर पर्यटकांच्या सोयीसाठी म्हणून छोटी-मोठी पुस्तीका, ब्रोशर द्यायची पध्दतच नाहीये. बरं रस्तोरस्ती फुटकळ पुस्तकं, दैनिकं, मासिकांची दुकानही दिसायची नाहीत. अक्षरशः ऑस्ट्रेलीयाच्या एकदम उलट. ऑस्ट्रेलियातून मी दिडेक किलो तर नुसती लिफलेट्स आणली आहेत. जाऊ तिथे गठ्ठ्यानी ब्रोशर्स. तिही अनेक भाषेतली. गुळगुळीत कागदं, त्यावरचे इंप्रेसिव्ह फोटो, वेगवेगळे पॅकेजेस, त्याचे कॉंबिनेशन्स, रेटस्. अगदी सगळं वाचायचं म्हटलं तरी दोन दिवस पुरणार नाही एवढी चित्तार्षक माहितीपत्रक तिथे मिळत होती, दिली जात होती.
इथे इजिप्तमध्ये याबाबत सगळाच आनंद.
सगळा भरवसा फोनवर नसता आमने-सामने बोलण्यावर. पण त्यामुळे इथे मनमानेल तसा पैसा मागितला जातो असं माझं मत आहे. माझ्यासारख्या अजूनही छापलेल्या कागदावर, मॅप्सवर विश्वास ठेवणा-या व्यक्तीला इथे सफोकेटच होईल. एकूणच छपाई बाबत, पर्यटकांना छापील माहिती देण्याबाबत इथे औदासिन्यच आहे. एवढ्या पंधरा दिवसांत एकही राजकीय वा सोशल बॅनर आम्हाला दिसलं नाही.
वानगीदाखल इब्न तुलुम या अवाढव्य मशिदीत इस्लामचा प्रचार आणि प्रसार करणारी मोफत पुस्तकांची कपाटं होती. थोडी उत्सुकता दाखवली आणि हातात दोन ब्रोशर्सच तत्परतेने आली.
तसंच कैरोतच नाईल किनारी एक प्रायव्हेट कल्चरल सेंटर आहे. भरपूरच मोठं आणि पाच-सहा आॉडिटोरियम असणारं हे सेंटर इथलं एक हॅपनिंग ठिकाण आहे. इथे वर्षभर सातत्याने संगीत, नृत्य, गायन, सिनेमा, साहित्य रिलेटेड कार्यक्रम सुरु असतात. खाजगी असल्यामुळे कार्यक्रमांचा दर्जाही उत्तम असतो म्हणे. एकटी फिरताना मी इथे डोकावले होते. सुफी परफॉर्मन्स बघण्यात मला इंटरेस्ट होता. पण एवढ्यात कुठलाच कार्यक्रम नव्हता. पण त्यांची छापील कार्यक्रम पत्रीका मात्र मिळाली. एका हिजाबधारी लेडी स्टाफने सगळा परिसर फिरुन दाखवला. पण कार्यक्रम नसल्यामुळे सगळीकडे सन्नाटाच होता.

इजिप्तमध्ये आम्ही ज्या ज्या हॉस्टेलमधे राहिलो त्या त्या सगळ्या मालकांच एकच मागणं होतं.
Please write a review on Tripadvisor. That will help us immensely.
जाऊ तिथे हेच मागणं.
कमी-जास्त प्रमाणात सुविधा चांगल्याच होत्या सगळीकडे. माणसंही मदतीला तत्परच होती. पण एकाहीकडे माहिती पत्रकं, मॅप्स नव्हते. खरंतर भाषेची अडचण असताना तर छापील इंग्रजी इंन्फॉर्मेशनची जास्तच गरज असते. पण इजिप्तच्या पर्यटनविभागाला आणि व्यावसायिकांना अजून जाग आलेली दिसत नाहिये.

No comments:

Post a Comment