Sunday, 24 February 2019

गव्हर्मेंट कॉलेज.

औरंगजेबामुळे खडकीचं झालेलं औरंगाबाद हे नामकरणं. त्या औरंगाबादेतील पातशहाच्या बेगमचं वस्तीस्थान जनानामहल. त्याला लागुनच मर्दाना महल. दोन्ही ऐसपैस इमारतींच्या मधली पुरातन मशिद. मशिदीलगतची निजामकालीन इमारत. चाळीस वर्षांपूर्वी त्यात भरणारं गव्हर्मेंट कॉलेजचं म्युझिक डिपार्टमेंट.
आसपासची कडुलिंबाची, चिंचेची, वडाची, बुचाची भरगच्च झाडं. झाडांच्या सावलीतली ही संगीत विभागाची पिवळी-पांढरी इमारत.
आर्टस्कुलच्या माझ्यासारख्या विद्यार्थीनींचा डबा खायचं निवांत ठिकाण.
इमारतीतले सारेगमचे सुर, मैत्रीणींसोबतची डब्ब्यांची अंगतपंगत, गप्पांचे फड आणि डब्बा खाऊन झाल्यानंतर तिथल्या याच चिंचेच्या चिगुराचा आंबटगोड मुखवास.

जाने कहां गये वो दिन ?

टळटळणारा सुर्य.
तिच ती पिवळी-पांढरी इमारत.
खंडहरी वस्त्रांकीत.
हरवलेले सुर, विरलेले ताल.
हिरवीगार चिंच आणि तिची तितकीच शितल छाया.
झाडं पण नॉस्टॅलजिक होतात का ?

No comments:

Post a Comment