फेसबूकचं अकाऊंट उघडून ९ वर्ष झाली म्हणे. म्हणजे फेसबुकनी आठवण करुन दिली नसती तर लक्षातही आलं नसतं म्हणा.
बापरे, नऊवर्ष म्हणजे भरपूरच कालावधी झाला की. या काळात फेसबुकमुळे आपण सकारत्मकपणे किती बदललो असा विचार केला तर ठळकपणे जाणवणारी गोष्ट म्हणजे मी लिहिती झाले. सुरवातीला टाईप करायला शिकायच्या हट्टापाई लिहिलं, नंतर सुचेल तसं व्यक्त करत गेले. माझ्या दैनंदिन दिनक्रमात मला सुचणारे, व्यक्त करावेसे वाटणारे उलटसुलट विचार मांडत गेले. आणि आश्चर्य म्हणजे इथल्या वाचकांना ते लिखाण आवडायला लागलं. नुसत्या तोंड ओळखीतून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणा-यांच्या गर्दीत लिखाण आवडून मैत्रीचा हात पुढे करणारे बरेच जणं आढळून आले. सगळ्यांचीच कौतुकाची थाप वेळोवेळी उत्साह वाढवणारीच होती. म्हणजे स्वत:चा एक सुप्त गुणच जागृत झाला म्हणा ना.
आता हे लिखाण फार थोर नसलं तरी माझ्यात या लिखाणामुळे बराच बदल झाला. जसं जसं लिखाण सुरचीत होऊ लागलं तसं तसं क्लॅरिटी ऑफ थॉटसही बरेच सुरळीत होऊ लागले.
नाही म्हटलं तरी वाक्य रचनेचा, शब्दांच्या वळणांचा बराच सराव आपसुकच होऊन जातो. शब्दसंग्रह वाढतोही आणि संपुष्टातही येतो. मग जरा विस्तारीत वाचनाची निकड वाटायला लागते. इतरही बरेच लिहिणारे मित्रपरिवारात सामिल असतात. त्यातलं सगळं निरक्षीर पध्दतीने टिपायला मिळतं. जमतंच असं नाही. चांगल्या-वाईटासह पण एका वेगळ्याच सृजनशील प्रोसेसचे तुम्ही धनी होता.
मला वाटत नाही फेसबुक नसतं तर मी इतकी लिहिती झाले असते का नाही ते. So Facebook has invincible place in my current life.
फेसबुकमुळे झालेल्या सोशल हलचलीवर खरंतर खूप विस्ताराने लिहिता येईल.
पण एॅनिव्हरसरीच्या निमित्ताने मला प्रोपिक बदलायचा आहे. त्यामुळे फेसबुकने माझ्या हातात जे रोपटं दिलय, जे प्रामुख्याने मला आनंद देत रुजलंय त्याचाच फक्त उल्लेख केला आहे.
शुभेच्छा !
~~~कैरोतल्या इस्लामिक आर्ट म्युझियम मधला हा फोटो आहे. कुराणातल्या निवडक आयत्यांच्या कॅलिग्राफिक नक्षीने नखशिखांत भरवलेला हा गलेबियाचा प्राचीन अवतार.
No comments:
Post a Comment