एकेकटीचा १५-२० दिवसांचा प्रवास करुन यावं तर घरातल्या उर्वरितांच्या मदतीने घर हे अपरंपार व्यायलेलं असतं. तेही एकवेळ माफ करुन एखाद दिवसांत जीवाचं रान करुन घराची साफसफाई करावी आणि दुसरे दिवशी नवरोजींबरोबर निवांत नाश्ता करताना अरे या कामाचं काय झालं, त्या कामाचं पुढे काय झालं अशा कुतुहलात्मक भारंभार चौकशा कराव्यात तर,
अगं बाई..तू फक्त पंधराच दिवस गेली होतीस ना गावाला ? पंधरा दिवसांत अशा काय घडामोडी होणारं आहेत. चालली आहेत सगळी कामं आपली टुकू टुकू..असं म्हणत नवरोजींनी आपल्या उत्साहावर बोळा फिरवावा यापरतं दु:ख नाही.
तेही भर संक्रांतीत.
साखरेत घोळा का गुळात घोळा,
पुरुषांचा बायकांच्या आनंदावर विरजण टाकायचा गुण तिळभर देखील कमी होणार नाही हो.
खोटी आश्वासनं देत अशा कैक संक्रांत्या आल्यात अन् गेल्यात.
परिस्थिती जैसे थे !
No comments:
Post a Comment