Tuesday, 15 January 2019

FB Post

एका दूरदेशीच्या प्रवासाला जावं. काळाच्या शिंपल्यात लपलेली तिथली झगझगीत ऐतिहासिक मर्मस्थळं बघावीत. भरभराटीने स्पंदन पावणारं वर्तमान निरखावं. तिथली माणसं जोखावीत, पाणी चोखावं, सरतेशेवटी एकाच सागरात विलीन होणारी जीवसृष्टी न्याहाळत आपलं अनुभवाचं संचित समृद्ध करावं. आपलीही अहंपणाची, मीपणाची झोळी तिथेच रिकामी करावी आणि यावं परतुनी एक जूनी पात टाकून अन् एक नवी पात ल्येवून आपल्या कर्मा-धर्माच्या भूमीला.

आल्यासरशी घड्याळाचे काटे सहजपणे मागेपुढे सरकवत वर्तमानात यावं, काळ-वेळ गाठावी आणि भिडावं आपल्या रहाटगाड्याला.

No comments:

Post a Comment