Regal, royal and killer.
अक्षरशः इथे काऊंटलेस अहमद आणि महंमद आहेत. कुणालाही विचारा. एका आड एकाची नावं खर्जातून आवाज काढत आह्मत आणि माह्मद अशीच निघतात. कशी लक्षात ठेवतात कोण जाणे ?
पेहरावही जवळपास सारखाच असतो पुरुषांचा. गलेबिया नावाचा मातकट रंगाचा हिवाळी रोब आणि वर आपल्या भारतातल्या सारख्या नक्षीदार शालींच मुंडासं. सलग एकरंगी घोळदार गाऊन असल्यामुळे या इजिप्तशीयन्सच्या हालचाली दिसतात फार लयदार आणि फोटोजनीक. आणि नाकी डोळी रुप म्हणाल तर देखण्यांचीच संख्या जास्त आहे इथे. इजिप्त म्हणजे प्राचीन व संपन्न संस्कृती, युरोप अशिया खंडाचं मध्यवर्ती ठिकाण इथे माणसांच्या चेहरेपट्टीची फार विविध रुपं पहायला मिळतात. काळे, सावळे, मध्यम गोरे, फटफटीत गोरे, अटकर बांध्याचे, सडसडीत बांधल्याचे, धिप्पाड देहयष्टीचे तसेच नाकी-डोळी-ओठी-केसांचे रंग-वळणात
फार वैविध्य असणारे, अक्षरशः वागण्यात, आदबमधे पण फरक असणारे इतकी माणसं इथे दिसतात, भेटतातनं की आम्हा मायलेकींना छंदच लागलाय प्रथमदर्शनीच या माणसांचं असलं स्कॅनिंग करायचा आणि त्यावर चर्चा करायचा.
आपल्याकडेही प्रांतवार हे असलं रुपयाचं दार्शनिक वैशिष्ट्य जाणवतं पण महाराष्ट्रीयन माणसाला कुठलंच वैशिष्ट्यपूर्ण व लक्षवेधी रुप नाहीये हेही खरंच.
केवढी वैविध्य आहे माणसात माणसात ?
बापरे.
आणि त्यात हा इजिप्त देश म्हणजे तर अक्षरशः मेल्टिंग पॉट आहे या मानवी संकराचा.
असो. एकूणातच मजा येत आहे.
तर आपल्या इंडियन समुद्राचं पाणी भुभागात घुसल्यामुळे निर्माण झालेल्या रेड सीच्या काठावरच्या हरघाडा या उमद्या गावातल्या फळवाल्याचा हा फोटो.
आहे ना राजेशाही फळवाला ?☺️
Monday, 7 January 2019
Egypt...8
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment