Saturday, 5 January 2019

Egypt...7

आज लुक्सारच्या पहाटेच्या कडाक्यात हॉट एयर बलूनची फन्टॅस्टिक राईड करुन आलो. इथे सध्या भरपूरच थंडी आहे. बघण्यासारखं पण खूपच आहे. त्यामुळे गरजे प्रमाणे पहाटे-सकाळी निघायचं ते मरणाची पायपीट करुन रात्रीचं मुक्कामी परतायचं असं चालू आहे.🙄
रोजच्या धावपळीत केसांची वाट लागली आहे.
(वाट म्हणजे केसांची वळणं, फॉल, बाऊन्स वगैरे )🤯
तर आज परतल्यावर आंघोळी-पांघोळी उरकून झिप-यांच पोनीटेल कसंबसं बांधून, झकास तयार होऊन अस्मादिक हॉस्टेलच्या गच्चीवर ऊन्हात अंग शेकत बसले तर इंदीया..इंदीयाच्या हुकमी कॉम्प्लीमेंटस् आज इटालीयन..इटालीयन झालेल्या.😲
च्यामारी!
एका रात्रीतून आपण इटालीयन कसे काय झालो बुवा ?🤔

हरकत नाही. आपल्याला काय इटालीयन तर इटालीयन.😉

तो मेरे प्यारे देशवासीयों मैं वापस आ रही हूं.
हमें 2019 के लिये तैयार रहना है और एकसाथ लडना है!✋

No comments:

Post a Comment