आस्वान ते लुक्सार रेल्वे प्रवास. पहाटेचीच ट्रेन. कुठेही जा तीन दिवसांचा बसेरा झाला की त्या जागेबद्दल आत्मीयता वाटतेच. तसंच आस्वानचही झालं. जमलेला मांड उचलायचं जीवावर आलं होतं.🙄
निघालो.आरामशीर रेल्वे. खूप गारठा. तरीही प्रवास छानच झाला.
उतरुन टैक्सीत बसलो की अमिताभ बच्चन आलाच स्वागताला. अक्षरशः जळी-स्थळी अमिताभच आहे इथे. वैताग आलाय नुस्ता याचा.😲
या परक्या ठिकाणी आपला नवरा, आपला लेक विसरायचा आणि या अमिताभला लक्षात ठेवायचं. कवतिक संपून टाळकं फिरायचंच काम आहे राव.😒
हॉस्टेलमधे चेक इन केलं तर,
hello..my name is Nissar म्हणत तरतरीत हॉस्टेल मालक सामोरा आला.
Are you Indian? I love India. When I was small I used to watch many hindi movies. You know Sholey ? Amitabh Bachchan ? Best movie ever.
Nowadays because of business I don't watch many movies but Amitabh Bachchan, great actor.
Must be old now? And what about Dharmendra ?
..Yes, he is also there. He is also old.
But of course his sons are there now.
No..no..no..they can never be like their father. Dharmendra the best.
अभिषेक बच्चन तर बिचारा अनुल्लेखीतच राहीला.
असो.😐
एका सुप्रभातीची ही बॉलीवूड एक्स्प्रेस आता आपल्या हिरॉईन्सकडे वळायच्या आधीच आम्ही इथला सुप्रसिद्ध करकडी हा जास्वंदांच्या फुलांचा गरमागरम चहा मागवला आणि संभाषण आटोपतं घेतलं.😋
No comments:
Post a Comment