Thursday, 3 January 2019

Egypt...3

इजिप्तमध्ये पाऊल ठेवल्यापासून आम्हाला पाहून इंदीया विचारायचं आणि मग अमिताभ बच्चन, शारुक खान, कत्रीना, करिनाच्याच चौकशा आणि वेरी गुद, वेरी गुद असे कौतुकोदगार, चित्कार काढतात इथले विक्रेते, ड्रायव्हर्स आणि इतर लोकं.
😲

काल आस्वान सारख्या टोकाच्या ठिकाणच्या एका आडबाजूच्या नुबियन व्हिलेजमधे कम रंगबिरंगी बाजारात आम्ही मायलेकी गेलो होतो. परत तेच इंदीया, नमस्ते, अमिताभ, शारुक, करिना कत्रीनाचे हाकारे. 🙄
एकाला आपला बुजुर्ग गरम धरम भलताच आवडत होता तर एकला मिथ्थुनदाच प्रिय होता. एकाला महबुबा..महबुबा गाण्याने झपाटलेलं तर एकजण आपल्या हेमा मालिनीवरच जाम फिदा.😉

Oh ! You know Hema Malini also ? Dharmendra also ?
Yes..yes..madam, Dharmendra-Hema Malini my favorite.
Kareena-katrina also very good.
Who is your favourite madam ?
आता आली का पंचाईत.
या तारांकीत पंगतीत आपल्या तब्बू, शबाना, नसीर, नवाज्जूद्दीनची तर पत्रासही नसेल.
काय सांगावं ? अस्मादिकांना नेमकं हजरजबाबीपणे ओमर शरिफचं नाव घ्यायचं सुचलं आणि तिथल्या तमाम इजिप्तशीयन-नुबियन्स विक्रेत्यांनी उस्फुर्तपणे कडकडून टाळ्या वाजवल्या.
असा असतो बरंका आपल्याचा महिमा!😊

तर फोटोत आपल्याच हेमा आणि करिना,
मिस्र संस्कृतीचा झेंडा अटकेपार नेणारा राजा रामेसीस आणि राण्या नेफ्रेतीती-नेफ्रेतीरी यांच्या जगप्रसिद्ध अबू सिंबेल या मंदिरात बसल्याहेत.😁

No comments:

Post a Comment