Monday, 14 January 2019

Egypt...12 शुकरान इजिप्त.

आज इजिप्तहून, कैरोहून निघणार.
गेले चार दिवस तशी एकटीच फिरले, राहिले.
भाषेची अडचण, बोलायला कुणी नाही. जराशी कंटाळलेच. मुख्य म्हणजे आधी लेकीबरोबर दहा दिवस फिरल्यामुळे हा एकटेपणा जास्तच ठुसठुसणारा वाटला.पण तरीही सगळीकडे फिरले. इथल्या बहुतांश इच्छित गोष्टी पाहून-अनुभवून झाल्या. तरी पण नमुदच करायचं म्हटलं तर फेलूका बोटीत बसायचं राहिलं, नाईल क्रुझचा प्रवास राहिला, बेली डान्स बघायचा राहिला, सुफी संगीताचा कार्यक्रम बघायचा राहिला. ओएॅसिस बघायचं राहिलं आणि मुख्य म्हणजे क्लियोपात्राचं अॅलेक्झांड्रीया आणि तमाम जगताला वेड लावणारा मेडिटेरीयन समुद्र बघायचा राहिला.
अरेच्या ! आठवून लिहायला बसले तर yet too see ची लिस्ट बरीच मोठी झाली की.
असो, इथे परत यायलाही निमित्त नको का ?

शक्य तेवढ्या वेळात, खर्चात पाहिलंही भरपूर, अनुभवलही खूप.
पण जे मनानी वेचलं आणि कानांनी टिपलं ते तर भन्नाटच आहे.

There are so many minute similarities between Indian and Egyptian culture. But at the same time there are many profound differences also.
But all said and done, Thank you Egypt for the warmth you showerd on us.
Long live this essence of our brotherhood.❤️

गलेबीया हा इजिप्तचा राष्ट्रीय पेहराव आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही.
घोळदार एकरंगी, कळीदार गाऊन असतो. याला दोन्ही बाजूंनी भलेथोरले खिसे असतात. या गाऊनच्या आत घट्ट पॅन्ट व बनियन सदृश कुडता घालतात. हिवाळ्यात वुलनचे, जाडसर, बेताच्या रंगांचे हे गलेबीया वापरतात. उन्हाळ्यात मात्र कॉटनचे पांढरे, पातळ गलेबीया पुरुषमंडळी वापरतात. महिलांचे ही एलाईनसारखे लेसेस लावलेले रंगबिरंगी गलेबीया मिळतात. पण पुरुषांच्या एक रंगीत गलेबीयाची मजा काही और आहे. या गलेबीयावर आपल्या काश्मीरी नक्षीदार शालींसारखी उपरणी असतात. ऊन-वारं बघून गळ्याभोवती, डोक्याभोवती गुंडाळायला त्याचा वापर करतात.
अस्मादिकांची खान अल् खलिलीमधली एक ह्रद्य खरेदी गलेबीयाची. 😍😁

No comments:

Post a Comment