Sunday, 30 December 2018

Egypt...1

लेकीला मिळालेल्या एका फ्रिलान्स कामाचं ट्रेनिंग म्हणून ती आणि तिच्या बरोबर दहाएक दिवस फिरायला म्हणून मी अशा दोघी मायलेकी इजिप्तमधे आत्ताच डेरे दाखल झालो आहोत. एवढ्यातच ऑस्ट्रेलिया खंडावर जाऊन आले आता अफ्रिका खंडाची पायधूळ झाडत आहे.
बस्स, देशविदेश के धुल पे लिख्खा है मुसाफिरोंका नाम.😊
आयुष्यातली पहिली परदेशवारी इजिप्तलाच करायची असं कधीचच ठरवलेलं. मधेच ऑस्ट्रेलिया बाजी मारुन गेला. असो. पण ध्यानीमनी नसताना इजिप्तचा नंबर लगेचच लागला.🤗
इजिप्तची प्राचीन संस्कृती, नेत्रदीपक अवषेश, सध्याची इस्लामिक संस्कृती, बुरखाधारी महिला, सुरमे, वाळवंट, नाईलनदी..अस्मादिकांना तर पंढरीची वारीचं झाल्यासारखं वाटायला लागलंय.
🙏

जगातली एक प्राचीन संस्कृती असल्यामुळे काळ्या-पांढ-यांचा सुरेख संकर झालेला इथे निदान एयरपोर्ट वर तरी दिसतोय.
उंच, गो-या, काळ्याभोर भुवया-पापण्या आणि टपोरे डोळे असलेल्या भक्कम मुस्लिम महिला. अंगभर घोळदार काळे बुरखे, आतमध्ये चक्क जीन्स-टी शर्ट, लालचुटुक नखं-ओठ रंगवलेले, झाडून सगळ्यांच्या बॅगा लाल, भगव्या, निळ्या, डोळ्यांवर स्टायलिश गॉगल्स, हातात भल्यामोठ्या व्हॅनिटी बॅगा, वॉशरुम्स मधे बघाल तर सतत नट्टापट्टा तरी सुरु असतो नसता झुळझुळीत बुरख्यावर नखरेल जाळीदार हिजाब तरी गुंडाळत असतात. सगळी रंगरंगोटी आणि रुप त्या काळ्या घोळाखाली मार खाते.

आणि पुरुष ? एकजात सगळे हॅन्डसम. उंचेपुरे, भव्य कपाळ, कुरळे दाट केस, नाकी डोळी निटसं. सध्या थंडीचा कडाका आहे इथे त्यामुळे बहुतांश मंडळी सुट-बुटात. एकदम टकाटक. त्यात त्यांचा तो अरेबिक बोलतानाचा खर्जातला आवाज, मार्दवशील बोलणं. कडक सिगारेटचा वास..उफ्!
एयरपोर्ट वरच दोघंतिघं ओमर शरिफसारखे दिसले.
भलतीच भाळले की काय असं वाटतं असेल ना ?
आता प्रथम दर्शनी जे जाणवलं, तेही एयरपोर्ट वर तेच टिपलं आहे हो.
इथल्या जीवनदायी नाईल नदीच्या फेलूका बोटी फार प्रसिध्द आहेत. त्याचच एक झकास मोझाईक म्युरल कैरो एयरपोर्ट वर केलंय. कन्येचा हा फोटो तिथलाच.
😍

*** मुलीला विचारत आहे..अगं ते पुरुषांविषयी लिहू ना ? It's just first impression.😁
Of course Aai लिही. और सच्ची में सभी के सभी बहोतही अच्छे थे! Real good looking men.😲

No comments:

Post a Comment