Wednesday, 28 November 2018
मेलबर्न.
एक सुरम्य सकाळ मेलबर्नमधली.
ऑस्ट्रेलियातले रस्ते, झाडी, स्वच्छतेच्या या विषयी आता परत परत न लिहिता इथल्या मेलबर्न मधल्या प्रथम दर्शनीच मनात घर केलेल्या गोष्टींबद्दल सांगते.
सुखद गारव्याची सकाळ, उबदार उन्हाला नुकतीच जाग आलेली. सकाळचे सव्वा आठ वाजलेत. नोकरदार कामावर निघालेत. किणकिण बेल मारत अटकरी ट्राम्स सफाईने रस्त्यांवरन फिरताहेत. तरुण मुलं-मुली फटाफट सायकलींवरन कामावर, कॉलेजेसना निघालेत. गोरेगोमटे हेल्मेटधारी चैतन्यदायी तरुण-तरुणी सिग्नल दिसला की थांबतायेत, सिग्नल मिळाला की सटकन निघताहेत. बाजूने किणकिण ट्राम्स दुडूदुडू धावताहेत. रस्त्यांवर गर्दी असूनही फक्त ट्राम्सची बेल ऐकू येत आहे. इथल्या ट्राम्स आणि सायकलधारी मुलं बघणं एक अत्यंत सुखद आणि स्फुर्तीदायी अनुभव आहे.
खरोखर मेलबर्नच्या या सायकलधा-यांनी मन जिंकलं.
जुग जुग जियो मेरे लाल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment