माझे पेंटिंग्जचे विषय सहसा महिला, बुरखाधारी स्त्रिया असे असतात. तर आज जरा नेटवर बुरखाधारी स्त्रिया बद्दल वाचत बसले होते. नकाब, अबाया, बुरखा, चादोर अशा नावांनी ही महिलांना नखशिखांत पडद्याआड करणारी वस्त्रपावरणं ओळखली जातात. आपले शाल आणि चादर हे नावं तिथूनच आलेले आहेत.
अरब देशात स्त्री देहा व्यतिरिक्त स्त्रियांचे केस देखील पुरुषी नजरेपासून लपवावे लागतात. संपूर्ण देह, नाक, ओठ आणि चेहऱ्याचा बहुतांश भाग झाकावाच लागतो. ढोबळपणे पर पुरुषांवर या स्त्री देहाची, रुपाची मोहीनी पडून अनर्थ होऊ नये म्हणून हा बंदोबस्त.
पण केसांनी काय घोडं मारलय ?
हिजाब, ओढणीने डोकं न झाकलेली अरब-मुस्लिम स्त्री दिसणं अशक्यच.
खरंतर स्त्रियांच्या चेह-याला किती सुरेख महिरप मिळते या केशसंभाराने. आणि या केशसंभाराने किती छान शृंगार करता येतो महिलांना. आपल्याकडे तर शेरोशायरीला स्फुरण चढतं हा मायाजाली केशसंभार बघून. पण त्या देशांमधे महिलांनी पुरुषांसमोर डोकं उघडं ठेवून केस दाखवणं म्हणजे महापाप.
तर आज शहरातल्या एका नामांकित संस्थेच्या क्लासिकल नृत्याच्या कार्यक्रमाला गेले होते.
नेहमीप्रमाणेच सुरेख आयोजन, निष्णात नृत्यांगना. त्यांचे ते शरीर सौष्ठव उठावदारपणे दाखवणारं ड्रेसिंग, मेकअप आणि दागदागिने. नजाकतदार पदलालित्य, लयदाय हालचाली..स्पॉटलाईटखाली तर या नृत्यांगना अक्षरशः एखाद्या शिल्पासारख्या दिसतात. नृत्याविष्कार तर दूर राहिला, पण यांना नुसतं स्टेजवर बघणं सुध्दा नजरबंदीचा अनुभव देऊन जातं.
तसाच तो कार्यक्रमाला आलेला रसिकवर्ग.
अर्थात तरुण महिलाच जास्त.
कलेला दाद देणारा रसिक तोही दर्दीपणेच तयार होऊन आलेला. मी सगळ्यात मागे बसलेली. त्यामुळे सगळा रसिकवृंद मला पाठमोराच दिसत होता. छोटेखानी सभागृह अंधारलेलं आणि स्टेज मात्र उजळलेलं.
कुणाची वेणी, कुणाचं पोनीटेल, कुणाचा बुचडा, कुणी केस मोकळे सोडलेले. कुणाचे काळे, कुणाचे भुरे, कुणाचे कुरळे, तर कुणाचे सरळसोट.
कुणाच्या केसात गुलाब, तर कुणाच्या जाई. तर कुणाच्या केसात चमकदार हेयर क्लिप.
तमाम विद्यार्थी नर्तकींनी शेवंतीच्या भारदस्त वेण्या बुचड्या भोवती माळलेल्या.
चटपटीत रंगातल्या रेशमी, सुती देखण्या साड्या, ऐटबाज गळ्यांचे स्टायलिश ब्लाऊजेस..
समोर नजरबंद नर्तन सुरु आहे. देखणा ऑडियन्स तल्लीन झालाय, फुलांचा संमिश्र मंद वास सगळीकडे दरवळतोय...
एक मदमस्त मैफिल अनुभवायला मिळतीये.
The entire audience was looking so sensuous.
मला दुपारचे विचार आठवले.
Yes, women's hair can really entice you. म्हणून तर हिंदू-बुध्द धर्मात अध्यात्म करणारी माणसं सपशेल वपन करतात. It distracts you.
सगळं पटलं, अनुभवलं तरी तहहयात पडद्याआडचा स्त्रियांचा केशसंभार काही पटत नाही बुवा मनाला.
No comments:
Post a Comment