काकू..तुमाला यक विचारु ?
"..हो..."
तुमाला यकट्याला येवड्या मोठ्या घरात कसं करमतं ?
मी नेम्मी इचार करते की आपलं एवडूसं टिचभर घरं, घरात इतकी मान्सं तरी पन कदी घरात कुनी नसलं तर मला तं बिल्कुल करमत न्हाई. तुमाला ह्ये येवडं खाली वर मोट्ट घर हाय, दिवसभर तुमी येकट्या राह्ता..
कसं करमते तुम्हाला ? मला तं लगी आच्चर्यच वाटते.
"...का बरं तुला घरात कुणी नसलं तर करमत नाही का ?"
मंग ! कितीकं भांडने व्हऊ द्या, धुसफुस व्हऊ द्या, शिवी-तंटा व्हऊ द्या घरात मांन्स असल्येकीच बरे वाट्ते.
घराला मान्सांबिगर कसली आले शोभा ?
मी तं दोन दिवस बी माज्या माहेरी गेल्ये तं सासूला करमत न्हाई. किती बी कटकट अशेना, रिकामं घरं तं लगी खायाला उठ्ते.
तुमाला कसं करमते ओ काकू ?
No comments:
Post a Comment