समाधानी आनंद.
आमच्याकडे येऊन जाऊन काम करणारा खांदेशातला एक तरुण. सहसा हुरडा फेस्टिवलमधे या भागातली ही मुलं मोठ्यासंख्येने आमच्याकडे कामाला येतात. रहायला देखील मुक्कामी असतात. हुरडापार्टीच्या गदारोळात यांच्या ओळखी पण निटशा होत नाहीत. पण ही मुलं मात्र नेमाने तीनचार महिन्यांसाठी आमच्याकडे स्वतःहून येतात.
दिर्घ उन्हाळा. गावी काही काम नाही. तिथलीच दोनचार मुलं परत कामाला आली. भर उन्हाळ्यातलं झाडाझुडपांना पाणी द्यायच काम आणि जुनच्या तोंडावर वाळलेलं गवत, झाडोरा साफ करणे. उंच-सखल भागांच लेवलिंग करणे, झाडांसाठी खड्डे करणे अशी बरीच कामं करुन घ्यावी लागतात.
तर काल एक सांगितलेलं काम बघायला गेलो. उशीरच झालेला. मुलं दिवसाच काम आटोपून निघतच होती. पण आम्हाला बघून थांबली. परत जरा दिवस मावळे पर्यंत काम सुरु झालं. नवखी मुलं. मी चौकशी केली. तर चोपड्याकडची भिल्ल समाजातली मुलं आहेत ही. नावं विचारलीतर एकाचं आकाश, एकाचं रविंद्र, एकाचं असच काहीतरी. हल्ली माणसांची नावं सुध्दा किती एकसारखी झाली आहेत आणि आराध्या नावाचं अमाप पीक कीती गावोगावी, खेडोपाडी आलय असं बोलत आम्ही हसलो. सुपरवायझरने सांगितले या रवींद्रचा आजच रिझल्ट लागलाय
Saturday, 9 June 2018
दहावी पास.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment