चण्डीगढ मधे गेल्या गेल्या काय जाणवत असेल तर घनदाट एकसारखी झाडी, आणि झाडीत लपलेली विटकरी रंगाच्या बैठ्या पण प्रशस्त इमारती.
पहिल्या दिवशी संध्याकाळीच फिरलो होतो. पण आज पुर्ण दिवस हातात होता.
कालच्याच बैटरीवर चालणा-या रिक्षावाल्याला दिवसभराचा ठेपा देऊनच ठेवला होता. हवेत बदल झाला होता. पावसाच्या सरी येऊन गेल्या होत्या.
ब-यापैकी उघड्या आणि हळू चालणाऱ्या रिक्षातून चण्डीगढ बघायला मजा येणार होती.
उशीराच बाहेर पडलो. पहिल्यांदा नेकचंद यांचे सुप्रसिद्ध रॉक गार्डन पाहिले. तरुणाईचीच खूप गर्दी. सेल्फीजचा सुळसुळाट. रॉक गार्डनची आयडिया जरी छान असली तरी बराचसा तोच तोचपणा आहे. गार्डन मधून बाहेर पडतानाची पुरुष-महिलांची-मुलांची-प्राण्यांची एकसारखी शिल्प मात्र लक्षवेधक आहे. आदरवाईज इथल्या ठिकठिकाणांचा उपयोग आता सेल्फी पॉईंटस म्हणूनच जास्त होत आहे असं दिसलं. लोकांना चिल करायला ठिकाणं हवीच असतात. No one thinks about the creative part of it. नाही म्हणायला चिंध्यांपासून बनवलेला बाहुल्यांचा सेक्शन मला भावला. आतला एम्बीयन्स, लायटिंग आणि रंगबिरंगी मोठाल्या भारतीय रुपातल्या हस्तकलेतल्या बाहूल्या. अप्रतिम नसलं तरी मस्ट व्हिजीट ठिकाण.
नेमका सोमवार होता. बरीचशी सरकारी म्युझियम्स बंदच होती. रोझ गार्डन मधे फेरफटका मारला. सिझन नसल्यामुळे गुलाब फुलं नव्हतीच, पण ऐसपैस, शांत, मन प्रसन्न करणारा हिरवागार परिसर. जर चण्डीगढ हे करु शकतं तर आपली बाकीची शहरंही हे करु शकतील असं वाटल्यावाचून राहिलं नाही.
तिथून मग जापानीज गार्डनमधे गेलो. शहरातल्या एकाभागातून वाहणा-या पाण्याला(नाला?) अडवून त्या आसपासच्या चिंचोळ्या उतारावरच्या जागेवर हे गार्डन आहे. सामान्य दर्जाचे एकदोन पैगोडे. पुलावरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ही बाग फुलवलेली आहे ही जमेची बाजू आणि हिरव्यागार लॉन्सची बेतशीर टेकाडं एवढच आम्हाला इथे भावलं. परत जिथे तिथे तरुण जोड्या, त्यांच्या सेल्फ्या.
मग जरा पोटात कावळे ओरडायला लागले म्हणून सिंधी स्विटस् या मिठाई दुकान कम रेस्टॉरंटमध्ये गेलो. चकाचक डिस्प्ले. पंजाब्यांनाच शोभतील असे दांडगे रसगुल्ले, रसमलाया आणि इतर पदार्थही.
मुगाच्या डाळीपासून बनवलेली खुटखुटीत बेडमी पुरी आणि आलूभाजी खाल्ली. आणि दोघात एक झकास लस्सी घेऊन हॉटेलकडे निघालो.
चण्डीगढ. पंजाब आणि हरियाणाची राजधानी. तरी इथे फार कमी पगडीधारी सरदारजी दिसतात. मुस्लिम तर नगण्यच. आखीवरेखीव प्रशस्त सिक्स लेन, फोर लेन रस्ते. त्याच्या दुतर्फा दोन लेन इतक्या रंदीत भरपुर एकसारखी झाडं, त्यानंतर ऐसपैस सर्विस रोड, सायकलिंग ट्रॅक, मग परत ऐसपैस कार पार्किंगची जागा आणि नंतर मग शक्यतो एक रंगी एकसारख्या व्यावसायिक इमारती. रस्तोरस्ती झाडं तर इतकी एकसारखी आहेत की शाळेत प्रार्थनेल्या उभ्या असलेल्या एकसारख्या मुलांचीच आठवण यावी.
बहावा, चिंच, पिपरी, स्पैथोडीया, बीजा, बेहडा, पिंपळ,निलगिरी, सिल्वर ओक अशा अनेक प्रकारच्या झाडांनी इथले रस्ते नटलेले आहेत. कुठेही कचरा, घाण, चिखल नाही. चांभार नाही, चहा-भजे-उसाच्या टप-या नाहीत. पीठाच्या गिरण्या, पंक्चरच दुकान नाही, लॉन्ड्री नाही, झेरॉक्सची दुकानं नाही, टेलर नाही, दवाखाने नाही, किराणा दुकानं नाहीत. प्रत्येक गोष्टींसाठी नंबर देऊन एरियाज सेक्टरवाईज डिमार्क केलेले आहेत. त्या त्या सेक्टरमधे जाऊन आपलं काम करायचं. जवळपास पन्नास सेक्टर्स मधे विभागलेल्या चण्डीगढमधे सेंट्रल म्हणावीत अशी साताठ तरी मोठ्ठे चौक आणि आयर्लंडस आहेत. पण कुठेही कसलीही पाटी नाही. राजकीय, सामाजिक बैनर्स तर औषधाला देखील नाहीयेत. रस्ता दुरुस्तीच काम देखील इथे इतकं आटोपशीर करतात की या कोप-याच त्या कोप-याला तरी कळत असेल की नाही अशी शंका यावी.
माझ्या दीड दिवसाच्या भटकंतीत मला मोजून पाच कुत्री दिसली. गाय तर एकही दिसली नाही.
रस्त्यांवरची वाहनही सगळी टकाटक
No comments:
Post a Comment