उन आणि घामाचा आणि फटिगचा कहर झालाय. प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतोय. काहीही करावसं वाटत नाहीये आणि केल्याही जात नाहीये.
रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी सारखं मोबाईल मात्र बसल्या बसल्या चाळवल्या जातोय. कशी कुणास ठावूक पण रॉन्देव्हु विथ सिमी गरेवाल या कार्यक्रमपर्यंत पोहोंचले. आणि सिमी गरेवालने एकेकाळची बॉम्ब एक्ट्रेस जीनत अमानचा घेतलेला इंटरव्हू ऐकत बसले.
वाढलेलं वय, जून्या प्रेमप्रकरणात कायमचा जायबंदी झालेला डोळा, भ्रमनिरास झालेलं मन, जीवनातलं हरवलेलं चैतन्य..खरोखर जीनतची कथा ऐकून भडभडून आलं.
सर्वसामान्य लोकांच्या मानाने फार काही वेडंवाकडं आयुष्य नाहीये. तरीपण हिंदी चित्रपटातल्या एका पहिल्या आधूनिक विचारांच्या बेधडक तारकेच आयुष्य इतक्या विपरीत आणि सामान्य वळणांनी जावं याचं सखेद आश्चर्य वाटलं.
मला काय भावलं असेल ते तिचं तटस्थपणे पण सच्चाईने स्वतःच्या आयुष्याकडे बघणं.
मग तो स्टारडम उपभोगतानाचा तारुण्य सुलभ गाफिलपणा असेल वा मातृत्वाच्या असीम ओढीने मजहरकडे आकर्षित होणं असेल वा प्रेम केलेल्या व्यक्तीची अथकपणे केलेली सुश्रुशा असेल वा स्वतःपासून तोडलेल्या मुलांसाठी व्यथित होणं असेल वा मी आईचं ऐकायला पाहिजे होतं अशी जाहीर कबुली असेल.
Indeed it was a very honest introspection.
आपल्या आयुष्यातील सगळ्या चढ उतारांचा जाहीर कबूलीजवाब देणं म्हणजेच उंफिश जीनत नावाच वादळ आता एक स्त्री म्हणून, आईम्हणून स्थिरावलय याची खात्रीच जणू. चित्रपट क्षेत्रापासून दुरावलेली जीनत आता पुर्णतः कौटुंबिक गोष्टीत रममाण झाली आहे. मुलांच्या
Thursday, 31 May 2018
जीनत अमान.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment