मला कोणत्याही विविध प्रांती गेलं की तिथला जूना बाजार धुंडाळायला आवडतो. बरच काही प्रांतीय वैशिष्ट्यपूर्ण दिसतेच. असेल खिशात दाम तर एखादी वस्तु खरेदी होतेच. तसच थोडं फार सोन्याचं पण होतं. No...No...Don't be under impression ki I am very rich. कुठल्याही वेगळ्या राज्यात गेलं की तिथले कष्टकरी ज्या भागात, बाजारात जातात त्या बाजारात डोकवायचं. चारदोन हजारांचे सोनेरी वैशिष्ट्यपूर्ण मणी घ्यायचे आणि घरी येऊन स्वतःच काहीतरी रंगीत मण्यांची ओवाओवी करुन सुटसुटीतपणे वापरता येतील असे दागिने-माळा बनवायच्या. सांभाळायलाही सोपे, गुंतवणूकही कमी आणि आपलीही हौस.
तर मध्यंतरी अशा स्वतः केलेल्या दोन तिन माळा घरातच ठेवल्या.
येता जाता लग्नकार्यात घालायला ब-या म्हणून. नसता लॉकरमधे दागिने ठेवून का हौस पुर्ण होणारे ?
आधीच एक चोरीचा झटका बसलेला आहे त्यामुळे सगळा विचार करुनच या वस्तू निगुतीने ठेवलेल्या.
पण का कुणास ठावूक एक माळ दिसेचना, सापडेचना. दोनचार वेळा नेहमीची ठिकाणं शोधून झाली तरी पत्ता लागेना. बैचेनी वाढली.
एवढ्यात परत एक रंगीत मण्यांची माळ ओवून आणलेली. एका मैत्रीणीला भेट द्यायची म्हणून. जोडीला तशीच माझीपण एकाच ठिकाणी ठेवलेली.
ती एक माळ करुनच जेमतेम आठ दिवस झालेले.
त्या माळाही सापडेनात म्हटल्यावर तडक सगळं कपाट उपसलं. कपडान कपडा, साडीन साडी झटकली तरी काही गवसलच नाही. पण या निमित्ताने साड्यांचा डोंगर, कपड्यांचा ढीग जमला.
कुठे ठेवल्या, कुठे गेल्या या माळा, कुणी उचलल्या तर नाहीना ? माझ्या अपरोक्ष कुणीच वर येत नाही आणि आलं ही नाही.
काय आपली मेमरी झालीये हल्ली. लक्षात ठेवायच्या म्हणून नोंद केलेल्या ब-याच गोष्टी लक्षातच रहात नाहीत हल्ली. जितकं काळजीपूर्वक ठेवू तितका धोका जास्त अशी परिस्थिती झाली आहे. काय करावं कळेना. विचार करत कॉटवर लवंडावं म्हटलं तर हा ढीग साड्यांचा. तो ढीग बघून तर मनस्ताप अजूनच वाढला.
काय काय आणि किती किती जमवतोय आपण ?
किती पैसा घालवत, वेळ घालवत मनस्ताप विकत घेतोय आपण ? खरच काही धरबंद राहिलेला नाही.
सगळं अधूनमधून कळतयं पण नियमित वळत का नाही.
आणि विस्मरणाची तर गंमतच वाटायला लागली. स्वतःच कुठेतरी वस्तू ठेवायची आणि मनातल्या मनात दुस-यांवर शंका घेत रहायच्या. चिडचिडच वाढली. मनस्वास्थ्य हरवलं. मनातल्या मनात चडफडण्या वाचून पर्याय नव्हता.
वस्तूंच्या बाबतीत झालं गेलं गंगार्पण म्हणता येईल पण स्मरणशक्तीच काय ?
वाढत्या वयाचे धोके जाणवायला लागले. पुढचा काळ कठीण वाटायला लागला.
हे संचय करणं बंद केलं पाहिजे. नसता सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या पाहिजेत. आपण उद्या असू - नसू. मुलं काय काय बघतील आणि कुठे कुठे शोधतील ?
आपल्या पश्चातच्या वाटावाटीचं लगेचच लिहून ठेवलं पाहिजे.
I am still hopeful कि त्या माळा मिळतील. कुठे ठेवल्या आहेत हे माझ्याच स्मरणात नाहीये. पण त्यांच्या हरवलेपणानी एक वेगळीच जागरुकता आली आहे.
आपल्यालाही हल्ली विस्मरण होतय याची जाणीव झोप उडवणारी आहे. आणि हा संचयाचा महामेरू छाती दडपवणारा आहे.
Absolutly feeling vulnerable, lost and worried at this point.
Saturday, 26 May 2018
बुढा होगा तेरा बाप.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment