नुकतीच फेसबुकवरच्या पोस्टस् मुळे One day after another day ही शॉर्ट फिल्म बघण्यात आली. स्त्रियांवरचे शाब्दिक, शारीरिक अत्याचार, त्यामुळे त्यांची होणारी घुसमट आणि एकीतून त्यांनी केलेला प्रतिकार अशा आशयाची ही उत्तम फिल्म आहे. त्यातल्या ज्या एका सीनने मला ही पोस्ट लिहायला प्रवृत्त केलं आहे तो म्हणजे राधीका ऑफिसमध्ये कार्यमग्न होतं काम करत असताना तिथलेच दोन कर्मचारी तिला निरखत, तिच्या विषयी सहेतुक अगदी वाचाळपणे बोलतात तो.
अगदी निरुद्देश पण अतिशय किळसवाणं बोलणं वाटतं ते. काहीही घेणं देणं नसताना उगाचच दोन मित्र तिच्या विषयी एखाद्या वस्तुविषयी बोलावं तसं बोलतात.
पण चिड जास्त यामुळे आली की कारण ते सगळं खरं आहे म्हणून.
आपल्या आसपास देखील अशीच माणसं बरेचदा असतात ती अशीच बोलत असतात. मला बरेचदा हे अनुभव आले आहेत. म्हणजे अगदी शाळकरी वयात सुध्दा मुलं मुलींविषयी अशीच बोलायची हे कळून तर मी एवढ्यातच हतबुद्ध झाले आहे.
का हा मुलांचा वैषयीक दृष्टिकोन कायम जागृत असतो समजत नाही ? बाल वयातलं, शालेय वयातलं एकत्र शिकणं, खेळणं, बागडणं, भांडणं सुध्दा या अशा कामूक चष्म्यातनंच बघायची असतात का ? त्यातली निर्भेळता यांना कळतच नाही का ?
मला तर हे रोगटपणाच लक्षण वाटतं.
अगदी पन्नाशीनंतर सुध्दा भेटणारी शाळेतली मुलं जेव्हा जून्या घटनांकडे अशाच पध्दतीने बघत असतील,
अजूनही तसंच बोलत असतील तर त्या पुरुषांची,नरांची कीव करावी तेवढी कमी आहे.
अगदी आजचे सासरे,आजोबा झालेले पुरुषही जेव्हा मित्रांमधे 'बसले' की अरे..ती नाही का..अरे ती त्या क्लासला जायची ती..अरे ती तुझ्या धाकट्या बहिणीची मैत्रीण रे..करत जेव्हा तेंव्हाच्या मुली-मैत्रीणी आणि आजच्या महिला-मैत्रीणींवषयी असं अघळपघळ बोलतात तेव्हा त्यांना कुठच्या दर्जाचे पुरुष म्हणावं आणि मित्र तरी का म्हणावं असा प्रश्न मला तरी पडतो.
तथाकथित विचारी, पोक्त पुरुष गृहस्थ असे का वागत असावेत ? मुली नाही अशा वागत.
आजची त्यांची पत्नी, मुलगी कुणाची तरी निरलस मैत्रीण होतीच-आहे यांचा त्यांना सोईस्कर विसर पडतो का ? का क्षणभरच्या शाब्दिक मौजेसाठी वो घरकी बात नजर अंदाज करना पुरती है ?
रोजच्या देमार कटकटीच्या आणि बोअर आयुष्याला एक झणझणीतपणा आणण्यासाठी तर ते असे मनाला गुदगुल्या करणारे आणि शरीराला वाफेवर आणणारं बोलतं नसावेत ?
पण हे खरं आहे की चारदोन मित्र भेटले की सहसा गतकालीन, चालूकालीन सहकारी मुलींविषयी, महिलांविषयी असं अतिरंजित बोलण्याचा तडका दिल्याशिवाय मैफिल पुर्ण होतच नाही.
I feel it's a gender based psychological disorder. या अशा आपसातल्या बोलण्याने कोणाच्याही शरीराला भोकं पडत नाहीत पण मनाला मात्र निश्चितच पडतात. आणि हे असलं बोलणं मात्र ज्या मैत्रीणीवर,महिलेवर त्यांच खरंखुरं(?) प्रेम होतं-आहे तिच्याविषयी कधीही खपवून घरी णार नाही. ती एक्स्लुजीव्हीटी पाळून बाकीच्यांच्या बाबतीत सबकुछ चलता है. हे असं का ?
Guys by behaving and talking like this you spoil the most healthy and nurturing relationship of man and woman, or may I say two dynamic species of this planet ?
But no one is bothered.
Everyone wants to release those suppressed and utterly hypothetical expressions in their comfort zones like this.
पुरुषांच्या जगण्यात त्यांची लैंगिक जागरुकता अशी अस्तरासारखी आयुष्यभर व्यापलेली आहे. तिचा हा असा वेळोवेळी विकृत अनुभव मुलींना-महिलांना येतच रहातो. बोलणा-याचं तोंड आणि विचार करणा-यांचे विचारही थांबवता येत नाहीत हे खरं आहे पण हे सभ्य गृहस्थांनो..We pity on you for this !
No comments:
Post a Comment