Monday, 5 March 2018

कथा आणि व्यथा टैक्सीवाल्यांच्या...२

मध्य मुंबई.
एकदम खटारा टैक्सी. त्याहून गया गुजरा टैक्सीवाला. बिहारी..म्हातारा..त्यातही भलताच गप्पीष्ट.
काळजीने मी पत्ता पुन्हापुन्हा व्हेरिफाय केला तर..
ओप चिंता मत करो..होम बराबर छोडेगा तुमको. पोचास साल से इदर है. बोम्बै में सब पता है होमको. पहेले बोम्बे भोत ओच्छा था.
ओ बाबू..ए भैया..ए अन्ना करके टैक्सीवालोंको भौत इज्जत मिलती थी.
ओब क्या सोब गुजर गोया. मै इदर रैता है. झोपडा है, लेकीन शहोर में है.

खरोखर टैक्सीवाला बराच थकलेला म्हातारा होता. स्टियरिंगवरचे हातही थरथरत होते. त्यात नॉनस्टॉप गप्पा.
...चाचा..मेरा ऐड्रेस ध्यान रखो..नही तो घुमाओगे मुझे.
चिंता मोत करो..मै बरोबोर छोडता तुमको.
जरावेळाने कॉन्फिडन्स येऊन मीही मग चौकशी आयोग  नेमला.
चाचा..आपका परिवार कहां है ? बच्चे भी गाडी चलाते है क्या ?
नोय..नोय..बच्चे भौत पढे लिखे है. कंपनी ऑफिस में साहब जैशा कोम करते है. मुझे बोलता कोम छोडो.
ओब जिंदगी गोई गाडी चलाने में, क्या करे घोर बैठ के ?
थोडा ओसपोस के पैसेंजर कोरता हुं...
वो देखो आ गोई तुम्हारी बैंक.
...चलो, चलो..यही पें रुको. आपने बहोतही बराबर लाया हमें. मै जरा डरही गयी थी. काफी अंधेरा हो गया ना ?
दिदी मै बोला ना, छोटा बोच्चा भी रहा ना गाडी में ओपन चिंता नोही करना. होम बरोबोर छोडेगा और पैसा भी बरोबोर लेगा...फसाने का कोई काम नई.
किसीको फसाके, ज्यादा पैसा लेके क्या कोरना है.

स्वच्छ आणि प्रामाणिक मनाच्या परप्रांतीय टैक्सीवाल्याने गहि-या आणि घनगर्द मुंबईतील नितळ तळ दाखवत खरच माझी अस्वस्थता कमी केली.
अशा कितीकं जणांच्या मनात मुंबई घर करुन बसली असेल. जा आपापल्या राज्यात परत म्हणण सोपं आहे.
ज्यांच आयुष्य इथे गेलं त्यांचा आता देह जरी दुसरीकडे गेला तरी मन मात्र परत परत या अरबी समुद्रासारखं मुंबईतच थडकत राहील नाही ?

No comments:

Post a Comment