आत्ताच जरा बाहेर पडताना चांदीच्या लहान-मोठ्या बांगड्या चोखंदळपणे चढवताना श्रीदेवीचं शेवटचं रुप आठवलं. आणि मन खिन्न झालं.
दक्षिणेकडची अभिनेत्री असूनही तिचा फैशन सेन्स खरच खूप चांगला होता. स्टायलिश इंडियन, वेस्टर्न आऊट फिटस्,तशीच ती फैशनेबल ज्वुलरी, हेयर स्टाईल्स, परफेक्शन फेशियल एक्सप्रेशन-बॉडी लेंग्वैज out n out glamour figure. एवढ्यात तर I think all the time she was obsessed with her physical beauty and fashionable presentable looks. She was so conscious and alert about her image.
तरीही तिच्या मृत्युनंतर तिच्या सुहागन कलेवराला वरवरची गुंडाळलेली भारीची साडी, कशाही लावलेल्या सेफ्टी पिन्स्, सोनेरी माळा(बहुदा खोट्या),ठसठशीत मेकअप.. सगळा तात्पुरताच पण बटबटीत शृंगार केलेला. ती जिवंत असती तर तिने या गोष्टीतल्या किती गोष्टी घातल्या असत्या का ? आणि घातल्या असत्या तर तिने त्या अशा ठोकळेबाज पध्दतीने घातल्या असत्या का ? उत्तर आहे मुळीच नाही.
मग ही गोष्ट विचारात पाडणारी आहे. म्हणजे जिवंत असताना आपण वेगळ्याच विचारधारेने जगतो. आणि मृत्युनंतर मात्र आपल्या कलेवराला ऐनकैन कारणाने एका वेगळ्याच विचारधारेने दुसरे वागवतात.
जिवंत असताना आपण किती श्रमपुर्वक तयार होतो. चांगलं दिसण्याचा-वाटण्याचा खूप प्रयत्न करतो. पण तेच आपण आपला श्वास थांबला की कलेवर होतो आणि कुणा एकाच्या-कुटुंबाच्या समजूतीनूसार आपल्याला बेगडी सजवलं जातं-जात नाही.
त्यात सुहागन म्हणजे तर विचारुच नका.
ही गोष्ट प्रत्येकाच्याच बाबतीत होते. सिनेतारकांच्या बाबतीत जास्त ठळकपणे जाणवते इतकंच.
असच शेवटी शेवटी वृध्दांच्या-आजारी माणसांच्या बाबतीतही होतं.
जान है तो जहान है..हे जरी खरं असलं तरी मनासारखं जहान उपभोगायला उत्तम शारीरिक, मानसिक, आर्थिक, वैचारिक आरोग्याची जोड हवी, नसता कसंबसं जगण्यात आपल्या व्यक्तिमत्वाचे हे असे काही पैलू लोप पावतात.
मला वाटतं आपलं कलेवर कसं नष्ट करायचं याबरोबरच कलेवराला नष्ट करेपर्यंत कसं ट्रिट करायचं हेही आता लिहून ठेवायची गरज आहे.
No comments:
Post a Comment