Wednesday, 28 February 2018

कथा आणि व्यथा टैक्सीवाल्यांच्या...१

प्रॉपर मुंबईत सटासट टैक्सीकरुन एकटीने फिरायची मला सवय नाही. त्यामुळे मध्यंतरी जरा फिरायचा प्रसंग आला तर दडपणंच आलं होतं. पण केली हिंमत आणि बसले टैक्सीत.
पल्ला बराच लांबचा होता. त्यात रस्ते छातीठोकपणे माहीत नाही त्यामुळे जरा हरवल्यासारखंच वाटलं.
पण मुंबईचे टैक्सीवाले खरच चितचोर असतात.
असतात युपीवाले, बिहारी पण अगदी त्यांचीच मुंबई असल्यासारखं गि-हाईकांना मस्त आश्वस्त करतात.
तर हा टैक्सीवाला युपीवाला. तरुण, गप्पीष्ट मग काय आमची कुंडली जुळलीच.

युपीतल्या आडबाजूच्या खेड्यात बायकापोरं व इतर कुटुंबीय रहातात. बारा वर्षापासून हा इथे मुंबईत रहातोय. अंधेरी आसपासच्या वस्तीत रहातो.
सकाळचं जेवण बाहेर मेसमधे. रात्रीचं जेवण घरी करुन खातो. सध्या बायकोच्या हार्टच्या प्रॉब्लेममुळे त्रस्त आहे. एक १०-११ वर्षाची मुलगी आणि तिच्याहून लहान मुलगा आहे. चिडखोर बायको बराच त्रास करुन घ्यायची जिवाला. याला वाटायचं सासू-सास-यांच करावं लागतं म्हणून रागराग करते, पण डॉक्टरांनी तपासलं तर तिच्या ह्रदयाला छिद्र आहे म्हणून सांगितलं. ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. तिथल्या गावाकडच्या शहरात दवाखान्यात दाखवलं २-३ लाख खर्च सांगितला. मुंबई तर त्याहून महाग. मग हैद्राबादला दाखवलं तिथे दिड-दोन लाख खर्च आणि महिन्याचा खर्च वेगळाच. शेवटी शोधत शोधत वेल्लोरच्या क्रिश्चन दवाखान्यात लाख सव्वा लाखात काम होतय तर हा आता पैशाची जुळवाजुळव करतोय. बाकी सगळी धावपळ गावचे नातलग करताहेत आणि हा इथे मुंबईत पैसा जमवत राबतोय.

जनरल कौटुंबिक चौकशी केली तर २-३ वर्षात पोरीला उजवून टाकणार आहे.
...फिलहाल दहेज बहोत ठीक चल रहा है..फटाफट शादी करने में ही होशियारी है.
...इतनी छोटी लडकी और शादी ? आठवी कक्षा मे भी नही होगी और शादी ?
...हां..दहेज कम लगता है जी. समझो..अभी पांच लाख में काम होगा तो और पांच साल बाद दस लाख लगेगा.
शादी होके लडकी जबतक सयानी नही होती तब तक लडकी हमारे पासही रहेगी. तब तक लडका भी कुछ कमाने लगता है।
...अरे..लेकीन ये दो-तीन साल में लडका बिगड गया तो ?
समझो उसको कुछ ताश, मटका या दारु जैसी आदतें लग गई तो ? या फिर लडकी या लडके ने ऐसी शादी को ना कर दिया तो ?
हसून..नही जी, ऐसा नही होता है. उधर गाव में शादी हो गई तो परमेनेंट सेटिंगही होता है..कुछ बिगडता नही..और लडकी कैसी ना करेगी ? उसके मां बाप जो करेंगे वो सहीच होगा नं उसके लिये ?
वो हमारी सेटिंग बराबर रहती है गाव में. कुछ गडबड नही होती ये शहरों जैसी. यहां का मामलाही कुछ और है. ये बंबई बोले तो अपने समझ के बाहर है.

ये जो रस्ता है ना वो ***माता की तरफ जाता है. पहाडी पे मंदिर है. ४०० सिढिया है. रोज चढो तो सेहद बन जायेगी. मै ये रोज रोज १६ घंटे गाडी में बैठ के थक जाता हुं. गाडी से घर..घर से गाडी..बस ! आदमी पागल बन जाता है. थक गया की कभी कभार मै छुट्टी लेके वो मंदिर में जाता हुं.
उप्पर ऊंचाई पे अच्छा लगता है. खुली हवा..ठंडी हवा.
बहोत पावन माता है. आप गये है कभी मैडमजी ?
...जी न ही मै बाहर गांव से हुं. औरंगाबाद से.
आपने कभी अजंता-एलोरा या शिर्डीका नाम सुना है ?
हां..हां..एक बार शिर्डी आया था. वो औरंगाबाद बोले तो वो शनी शिंगनापूरवाला ?
हां..मै वही से हुं.
...अच्छा हमे भी एकबार शनीजीके दर्शन के लिये जाना है मैडम.
हां..जाओ ना. आपके घरवाली का ऑपरेशन ठीक हो गया तो दोनो भी जरूर दर्शन करके आना.
अरे बस..बस..थोडा राईट लेलो और रुको.
चलो ये लो पैसे..और धन्यवाद.
शुक्रिया मैडमजी. बहोत धन्यवाद. आपने इतना जो सुन लिया.
अरे उसका थोडी धन्यवाद रहता है  ?
शुक्रिया.

पोटच्या पोरांच व्यावहारिक सेटिंग लावता लावता बापाचंच मानसिक सेटिंग बिघडवणारी आपली पोटापाण्याची कळीची व्यवस्था गहन विचारात पाडणारी आहे.

No comments:

Post a Comment