Thursday, 15 February 2018

भुलवा.

यावर्षी नेहमीच्या नववर्षाच्या स्वागताच्या गदारोळापासून झटपट दूर जायचं म्हणून आम्ही दोघंच अजिंठ्याला गेलो. अजिंठा बघणं इच्छित नव्हतच. Just wanted to be away from maddening celebration.
अजिंठा,फर्दापुरात आमचे खूप परिचित रहातात, कारण आम्ही पंचवीस वर्षापासून नियमित जातो. तिथल्या होतकरु मुलांना पोटापाण्यासाठी आम्ही पुर्वी मदत केली आहे. त्यांना घेऊन जळगाव परिसरातील खदानीत खूप फिरलोय.
पावसाळ्यातल मनमोहक डोंगराळ अजिंठा बघून तर आम्ही अंजिठा परिसराच्या चिंब प्रेमातच पडलो आणि नंतर सारासार विचार केला आणि वेरुळ रस्त्यावर जागा घेतली आणि हिरण्य घडलं. तर अजिंठा परिसराशी अशी अतुट नाळ जुळलेली आहे.

फार पुर्वीपासून अजिंठ्याला विविध प्रकारचे सेमीप्रेशस रफ स्टोन्स मिळतात. म्हणजे अजिंठा-वेरुळमधल्या शिल्पीत,चित्रीत व्यक्तींनी अशाच सेमीप्रेशस स्टोन्सचेच दागदागिने घातल्याचं आपल्याला लगेच जाणवतं. खुल्ताबादच जुनं नावही रत्नपूर होतं. पदमावत फेम खिलजीमुळे देवगिरीची दौलत परत चर्चेत आली आहे बघा. मुघलांनी देवगिरी किल्ल्याच नाव देखील बदलून नंतर दौलताबाद ठेवलं म्हणजे कल्पना करा कीती वैभव होतं ते देवगिरी परिसरात.
तर महाराष्ट्रातील जळगाव आणि औरंगाबाद जिल्हा जगामधे मध्यम प्रतीच्या मॉस ऐगैट्स आणि एमैथिस्टसाठी प्रसिध्द आहे. मॉस ऐगैट म्हणजे उकळत्या लाव्हाबरोबर  थंड होत सॉलिडीफाय झालेलं लाव्हातलं शेवाळं. या ऐगैटला प्रकाशात धरल्याशिवाय त्याचं शेवाळी सौंदर्य कळत नाही. ज्वुलरीसाठी याचा बराच वापर हल्ली करतात. पण ऐमेथिस्टच तसं नाही.याच्या कणखर गर्द-फिक्या जांभळ्या रंगाची पाहताक्षणीच मोहीनी पडते.
थंड होत जाणा-या लाव्हातले हे बुडबुडे एका विशिष्ट गैसमुळे कमी-जास्तप्रमाणात जांभळट क्रिस्टल सारखे होतात. मला हा स्टोन त्याच्या नावासकट, ऐतिहासिक कथांसह रंगरुपानी अतिशय आवडतो.
ऐमेथिस्ट इतका आवडतो की फेब्रुवारी महिन्याचा हा बर्थ स्टोन आहे तर आपण फेब्रुवारीत का जन्मलो नाही असही मला नेहमी वाटतं.
विकीपीडियावर याची खूप माहिती आणि रोचक कथाही आहेत, जरुर वाचा.

हल्ली हा दगड मुबलक प्रमाणात जगात सापडतोय म्हणून तो सेमीप्रेशस म्हणून आजकाल गणला जातो नसता पुर्वी amethyst was considered as prescious and saught after stone .
पुराण काळात नशेवाल्यांना नशा चढू नये म्हणून ऐमेथिस्टचे मद्याचे प्याले बनवले जात. ऐमेथिस्टमुळे नशा चढत नाही हा समज त्याकाळी होता.
असो पण या ऐमेथिस्टने मला मात्र भुरळ पाडली.
फोटोत आमच्याच अजिंठा परिसरात सापडलेला रॉ स्वरुपातील एमैथिस्ट आहे. तर छोटे लंबगोल आंध्रप्रदेशातील खदानीतील कटस्टोन आहेत. आणि जो मोठा ग्लोब आहे तो यावर्षीची बर्थडे गिफ्ट आहे म्हटली तरी चालेल. अजिंठ्यातच घेतला. विक्रेत्याने सांगितलं ब्राझीलचा आहे म्हणून but I doubt.
पण हे जमिनीखालचं लखलखीत, रंगबिरंगी विश्व खचितच अचंबित करणारं आहे मात्र.

No comments:

Post a Comment