Saturday, 10 February 2018

पारलेजी.

एकेकाळी ( म्हणजे अजूनही कुठे कुठे प्रचलित असेलच) लग्नासाठी मुली पहायला मुलाकडचे कुटुंबीय आणि हितचिंतक जात तेव्हा काही चारेक प्रश्न मुलींना विचारत असत म्हणे. 😕
जसं काही वाचायला सांगत, पाढे म्हणायला सांगत, स्तोत्र म्हणायला सांगत. चालूनही दाखवायला सांगत असत म्हणे.😱 मग कार्यक्रमाच्या शेवटी ऐपतीप्रमाणे चहा-पोहे होत असतं. मग मुलीकडची मंडळी त्यांची बेबी कशी गृहकृत्यदक्ष आहे हे हसत खेळत समोरच्याला पटवून देत असत. हे पोहे आमच्या बेबीनेच केलेत बरं. दारची रांगोळी पण तिनेच काढली आहे आणि हा टेबल क्लॉथही तिनेच विणलाय बरका..वगैरे..वगैरे. 🤗
तर या परिस्थितीत आता बराच फरक पडलाय. म्हणजे आता मुलींनी मुलं बघायला जायचे दिवसही दूर नसावेत.😍
तर मुलींनो आणि तुम्ही काय चौकश्या कराल बरं मुलांच्या ?🙄
सर्वात आधी स्वतःच्या कपड्यांच्या निटसं घड्या घालता येतात का ते बघा.😀
मग घरातली विजेची,पंख्यांची बटणं बिनचूक लावता येतात का ते बघा.😁
आणि सगळ्यात शेवटी त्याचा चटपटीतपणा बघायचा असेल तर वाफाळलेला चहा आणि पारलेजीचा अख्खा पुडा द्या आणि बघा किती सफाईने तो एकही बिस्कीट धारातीर्थी न पाडता किती बिस्किटे खाऊ शकतो ते.😂
हे जमलं तर तुमची सुखी संसाराची कुंडली जमलीच समजा !🤗

No comments:

Post a Comment