आज औरंगाबादला एक मैरेथॉन झाली. नेहमीचे यशस्वी ग्रुप्स शिवाय आज काही कॅन्सर,ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हावल आणि त्यांचे जिवलग सुध्दा सगळ्यांबरोबर धावले, चालले.
पहाटेची अंधारी झुंजूमुंजू वेळ तरीही शहरातला कलाग्रामचा परिसर उत्साही मंडळींनी गजबजलेला. टप्प्या टप्प्याने पळणा-या मंडळींना हिरवा झेंडा दाखवला गेला. सर्वात शेवटी एमजीएमच्या ट्युलिप कैंसर सेंटरतर्फे कैंसर सर्व्हावल स्त्रिया आपापल्या जिवलगांबरोबर धावल्या-चालल्या. अख्ख्या गजबजाटात या ट्युलिप ग्रुपचे देखणे, गुलाबी, चमकदार फुगे आणि टोप्या लक्ष वेधून घेत होत्या. बहुतांश महिलाच होत्या. कुणाचे पती, तर कुणाचे लेक-जावई, तर कुणाचे पालक आपापल्या हिंमतवान कैंसरमुक्त जिवलगांबरोबर, जोडीने,उत्साहाने धावले.
सहसा कैंसरग्रस्त पेशंटस म्हटलं की जरासं चिंताग्रस्त, निरुत्साहीच वातावरण असतं. पण या मैरेथॉन मुळे चित्र एकदम उलटं जाणवत होतं. आजारातून बरे झालेले पेशंट्स आणि त्यांचे नातलगही अगदी उत्साहाने आणि चैतन्याने सळसळत होते. सांगितल्याशिवाय पेशंट्स आहेत हे खरे वाटणार नाही इतकं उमद वातावरण होतं आज कलाग्राममधे. त्यामुळे Tulipsच्या आजच्या 'Run For Her' या स्तुत्य उपक्रमासाठी आयोजकांना देऊ तितक्या शुभेच्छा कमीच आहेत.
आपल्या समाजात एकेका शारीरिक आणि मानसिक आजारांचे उगाचच टॅबू आहेत.त्याचा बराचसा परिणाम पेशंट्सवर नातलगांवर नाही म्हटला तरी होतोच.
पण अशा आनंदी आणि पॉझिटिव्ह कार्यक्रमांमुळे या आजारांकडे बघण्याचा आणि त्यांना हाताळण्याचा दृष्टिकोन सार्वत्रिकरीत्या नक्कीच बदलेल. आणि त्याचे सुफळ परिणाम आपल्याला जास्त प्रमाणातच बघायला मिळतील.
एक सुजाण नागरिक म्हणून मलाही यांच्यासाठी,यांच्याबरोबर चालण्यात आनंदच वाटला.
हळूहळू का होत नाही पण समाजमन बदलतय याची ठोस खात्री अशा उपक्रमांमुळे नक्कीच होते.
जिगरबाज पेशंटस्..
सहभागी जिवलग...
आणि सुज्ञ आयोजक...
Three Cheers For Them.
Sunday, 4 February 2018
साथ-साथ.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment