Tuesday, 30 January 2018

Changing tides.

काल असंच माझ्या घरातल्यांशी हल्लीची मुलं त्यांचे आयुष्याकडे, लग्नाकडे, जोडीदाराकडे बघायचे बदलले दृष्टिकोन यावर बोलत होतो. ज्या घरात पालक मुलांमधे मोकळा संवाद असतो तिथल्या नवीन पिढीच्या थोड्यातरी मतांतराची माहिती पालकांना असते. बाळबोध पालक म्हणजे दक्षिण ध्रुव तर मुलं म्हणजे उत्तर ध्रुव हे दृश्य ब-याच ठिकाणी दिसतं. त्यामुळे एकूणचं पालकांच लग्न जमवणं तर मुलांच जोडीदार शोधणं इतक व्हेरीड पर्स्पेक्टिव्ह विवाह या विषयाला, कृतीला रहातं.
साहजिकच जून्या पिढीला या नवीन मतधारणेशी किंवा मुलगा-सुन,मुलगी-जावयांशी जमवून घेताना दमछाक होते आणि बराचसा भ्रमनिरासही होतो.
विशेषतः सुनांच्या बाबतीत ठळकपणे बोललं जातं. नेहमीप्रमाणे सगळ्यात कठीण जातं ते पारंपारिक, कौटुंबिक विचार करणा-या महिलेला म्हणजेच आई किंवा सासूला.
मग विषय वळला हल्ली मुलं आणि मुली विकेंड जोडीदारावरच फार खूष असतात. भलेही कृतीत सध्या ही कंन्सेप्ट कमी उतरत असेल पण विचारात तरी नक्कीच हा मार्ग सुखकर वाटतोय बहुतांश तरुणांना. So accordingly everyone is trying to become an totally independent individual.

हल्लीची तरुण मुलं करिअरच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळतात, झोकून देत श्रम करतात, भरपूर पैसा कमावतात. एकेकटे स्वयंपूर्ण घरं भाड्याने घेतात. नोकरवर्ग मैनेज करुन दैनंदिन संसारी कामं करवून घेतात. वेळ पडल्यास स्वैपाक,धुणी पण करतात. मित्र मैत्रिणी मिळून घरामधेच मस्त विकेंड पार्टीज अरेंज करतात. स्वैपाक करतात, आवरा आवरी करतात.
So freedom and space are the key words for them.
गोळाबेरीज संसारी कामांना हल्ली कुणालाच झटपट लग्न करुन बायको आणणं आणि सांभाळणं पटत नाही. असो.

तर मी हल्ली माझ्या मुलांना हेच पटवत असते. स्वतंत्र व्हायचंय, रहायचंय तर आधी 'must do' काम शिस्तीत, नियमित आणि काटकसरीत करायला शिका तरच तुमच्या हातात छंदांसाठी, पॅशनसाठी, फिरण्यासाठी वेळ, पैसा आणि आरोग्य राहिलं. नसता पोक्त वयात कठीण होईल.
तर त्याच सल्लागुटीचा एक भाग म्हणून टेबल आवरायला सांगितला की काही काम करण्याच्या विशिष्ट पध्दतींवरुन आमची खिटपिटच होते.
झालेला स्वैपाक मोठ्या भांड्यात काढणे. जेवणं झाल्यावर उरलेलं अन्न छोट्या भांड्यात काढून फ्रिजमधे ठेवणे. माझं तर अगदी हातात बसलेलं कामं. पण मुलगा आणि मुलगी दोघही ही भांडी बदलण्यास आक्षेप घेणारच.
आई..तू कामं आणि भांडी वाढवतेस. मोठं..छोटं..छोटं करत अशी किती बदलाबदली तू करत रहाणार ? एका पदार्थाला कीती भांडी लागतात बघ. कढई, मोठं पातेलं, मग परत उरलेलं काढायला एक, परत रात्री खाऊनही उरलेलं काढायला अजून छोटा बाऊल. किती भांडी, किती झाकण्या, किती तेच ते काम, एवढी भांडी धुवायला किती पाणी लागणार, जागेवर ठेवायला परत वेळ ,जागा किती लागणार ?
OMG ! Mom..आहे त्याच भांड्यात ठेवत जा पदार्थ.
अगं पण फ्रिजमधे जागा पुरत नाही. बाहेर ठेवलेला पदार्थ खराब होतो. You know..आपली भांडेवाली आपल्याकडे नाश्ता करते म्हणून. माहीत नाही वजनांनी फ्रिजमधले फायबरचे रैक तडकलेत ते ?
अगं हो पण..Chill mom. Let it be like this. नाही घर अपटुडेट राहिलं तर काय बिघडतं ?
It's our home. Relax.

असे खुपसारे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं न आपल्याकडे आहेत ना तरुणांकडे. Our living style has changed everything over the years.
एका वेळी कोणी उठत नाही, जेवत नाही, बाहेर पडत नाही किंवा रात्रीही परतत नाही. एका घरात राहून अक्षरशः प्रत्येकाचं सगळ्याच गोष्टींच दैनंदिन टाईम टेबल अतिशय वेगळं आणि स्वतंत्र झाल्यावर कसं काय होणार ? घरातल्या गृहिणींना विचारा. भडाभडा बोलतील.
पाणी, विज, मानवीशक्ती, पैसा, एनर्जी, वेळ या बेसिक गोष्टींची बचत होणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. कौटुंबिक एकोपा, सामंजस्य उंबरठ्या बाहेरच रहाताहेत हल्ली. अर्थात बहुतांश तरुणांनाही टोलेजंग, टकाटक, टापटीप घरांची अभिलाषा अजीबात नाहीये. प्रत्येकाला आपापली चुल हवीये. त्यासाठी सरपण तोडायची, आणायची देखील त्यांची तयारी आहे.
They just want their way of living.And for that they are ready to pay the price.
प्रत्येकाला आपापल्या मर्जीनुसार, पध्दतीनुसार,
विचारांनुसारच जगायचंय.
Live and let live is the mantra.

आता ही गुटी आपणच पचवायला शिकलं पाहिजे.

No comments:

Post a Comment