एखाद दिवशी जरा सकाळीच बाहेर पडावं म्हणून झटपट आवरावं तर नेमकं टाईम टेबल गडबडतं आणि घरी बसत हाती वेळच वेळ रहातो. 🤗
नेमकं हवामानही छान असतं,मुडही बरा असतो.😍
काहीतरी ठेवणीतली उचकपाचक केली की अक्षरशः मोडीत काढलेला,नकोसा म्हणून बाजूला ठेवलेला एक अख्खाच्या अख्खा संसार हाती गावतो.😮
जुने फेकायचे कपडे,शिवायला टाकायचे कपडे, फाडून चिंध्या जोडायचे कपडे, भरतकामाचं शिल्लक काम, चांदीचे दागिने धुवून-पुसून ठेवणे.😢
आलेले आहेर व्यवस्थित बेडवर मांडून त्यांची धोरणीपणाने कशी विल्हेवाट लावायची हे ठरवत त्यांची प्रतवारी करणे.😏
त्यातलीच एखादी गोष्ट अय्या..कित्ती छान आहे हे.. आता मीच वापरते हे असं म्हणत परत त्या वस्तुला सन्मानाने दत्तक घेऊन पुन्हा कपाटात सरकवणे.😀
जुन्या टाकलेल्या पर्सेस,चपला,गॉगल्स् नव्याने धुवून(नवीन न विकत घेता) परत वापरायची भिष्म प्रतिज्ञा मनाशीच करणे.😎
आणि अशाच कोलांट्या उड्या मारत साठ टक्के सामान गरजेचच आहे म्हणत परत सुस्थानी ठेवणे.🤔 म्हणजे शेवटी आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी सारखं कुठून कुठेही पोहंचत अख्खी दुपार अक्षरशः वाया घालवणे. 🙃
आणि मग घड्याळ बघत अग बाई चार वाजता जायचय ना तिकडे म्हणत उरलेला पसारा कसातरी गुंडाळून आणि कुठेतरी ढकलून देत नित्यकामाकडे वळत एकूण गोळाबेरीज शुन्यावर आणत हातची एक निवांत दुपार घालवून बसणे.😞😟😤
नाही म्हणायला या रिकामचोट कार्यक्रमात काही कैलरीज बर्न होतात आणि निदान एक पोस्ट तरी गाठीला नक्कीच लागते.😁
No comments:
Post a Comment