आपण मुलं जन्माला घालतो म्हणजे खरंतर एक स्वतंत्र आस्तित्व, भागधेय घेऊन आलेले जीव या पृथ्वी तलावर आणतो. आणि ते बाळ जीव आपणच बनवलेल्या जगरहाटीत वावरण्यास सक्षम होईपर्यंत आपण त्यांचा सर्वार्थाने सांभाळ करतो. साहजिकच आपली मुल्य, आवडी, विचारधारा हक्काने त्यांच्यात मुरवायचा आपण अटोकाट प्रयत्न करतो. मुलं लहान असे पर्यंत यातल्या ब-याच गोष्टी जमतात. पण मुलं जशी जशी मोठी होत जातात तेव्हा ते स्वतंत्राने वागायला लागतात. आणि मग बरेचदा आपला हिरमोड होतो की काय ही आपलीच मुलं का म्हणून.
मला स्वतःला आयुर्वेदाची लहानपणापासूनच आवड आहे. साधारण वयात आल्यावर आपल्या दिसण्या विषयी, रंग-रुपावषयी विशेष जागरुकता येते. मग त्यासाठी गुपचूपपणे बरेच उद्योग या वयात केले जातात.
तर मीही डाळीचं पिठ, हळद, दुध, सायींची उटणी अंगाला चोपडायची, केसांना दही, अंडी, विविध तेलं लावायची. अर्थात वयाप्रमाणे त्यातला अतिरेक कमी होत गेला पण हवामानातले बदल आणि वयानुसार काही गोष्टी मात्र तशाच टिकल्या.
अर्थात काहीही उपाय करा तूम मौसम को नही थमा सकते. केस पांढरे होणारच, स्किन कोरडी होत सुरुकतणारच..
थोडक्यात काळाचा महिमा कधी ना कधी शरीरावर दिसणारच.
असो.
तरी पण आपली मुलं म्हटली की प्रेमापोटी जास्त काळजी वाटत रहाते आणि त्यांची काळजी घेतलीही जाते.
तर माझ्या आवडी प्रमाणे मुलं लहान असे पर्यंत मी त्यांची या बाबतीतली काळजी खूप घेत असे. अधूनमधून केसांना, बॉडीला ऑईल मसाज करणे. ऋतुंप्रमाणे दही-दुध-हळद-साय-मध-बेसनांची उटणी वापरणे वगैरे. लहान असताना धम्माल करत हे सगळे कार्यक्रम होत असत, पण जशी ती स्वतंत्र विचारांची झाली तेव्हा माझं ऐकेनाशी झाली.
मग कॉलेजला गेली तेंव्हातर माझ्या पुर्वेला ते पश्चिम म्हणू लागली. तेलं, मसाज, उटणी, गुळ-हळद, आलं-लिंबू असे सीधेसाधे घरगुती उपाय फारच मागासलेपणाची वाटू लागली त्यांना.
अर्थात नको त्या कॉस्मेटिक्सच्या,उपचारांच्या मागेही ती अतिरेकीपणाने नाही लागली.
But they just didn't care about such things.
पण हल्ली जरा बदल होतोय असं जाणवतयं खरं.
मुलगाही आवर्जून सकाळी गरम पाणी-लिंबू घेत आहे. टिन्ड, पॅक्ड फुड, ड्रिंक्स टाळायचा प्रयत्न करतोय.
स्वतःहून सेल्फ डिसिप्लिन्ड व्हायचा प्रयत्न दोन्हीही मुलं करताहेत.
नव वर्षाच्या स्वागताला मुलगी पुण्याहून घरी आलेली.
यंदा सगळीकडेच थंडीचा कडाका फारच आहे.
त्यात तिचं पुण्यात 20-30 किलोमीटर रोज टू व्हिलर चालवणं, कामाचे दिर्घ तास, रात्रीच्या जेवणालाही बाहेर पडायची इच्छा नसणं..एकूणच life has become hectic and fast.
तर आत्ता घरी आली तर आई..आधी तू हिवाळ्यासाठी,
कोरड्या त्वचेसाठी चेह-याला, हातापायांना काय काय लावायचं ते सांग. आणि झटपट स्किन क्लिन कशी करायची तेही सांग. बाहेर फिरुन स्किन इतकी ड्राय आणि लाईफलेस होते ना की बास. आणि सुट्टीचा दिवस पार्लरमधे घालवणं म्हणजे No way !
More over parlours are sooo expensive and unreliable.I am scared to go there.
हं तर काय म्हणालीस ?
खोबरेल तेल, तिळाचं तेल, कैस्टर ऑईल, दुध, साय फॉर मसाज ?
मग परत एकदा आमची (खुमखुमीने) झटपट घरगुती सौंदर्य, आरोग्य उपचारांची उजळणी झाली. माझा तर ऊरच भरुन आला. आणि का नाही येणार ?
One more legacy is taken forward
आता नवी पिढी पण तुळस, पुदिना, तेलं, दुध, दही, साय, हळद, आलं, मध, ग्लिसरीन, लोणी इत्यादींचा जमेल तसा वापर करतील असं दिसतय. तसच स्वैपाकघराकडे सुध्दा डोळसपणे आणि प्रेक्टिकली बघतील असं वाटतयं.
So things are falling at its proper places असं म्हणायला हरकत नाही.
हुश्श !
चमच्याने भरवल्या पेक्षा समजून-उमजून आलेलं शहाणपण कधीही बरंच नाही का ?
पालक म्हणून आपण जरा जास्तच उतावळेपणा करतो नाही ?
असो. आमच्या मायलेकींच्या ह्रद्य संवादाला पुरक असा एक छान सेल्फी काढला.
ब्लॉग लिहून काढे पर्यंत फेसबुकवर 'मेरी बेटी मेरा अभिमान'..एक नयी शुरुवात असं एक कैम्पेन चालू झालंय असं दिसतय. मी अश्या अभियानात सहसा सहभागी होत नाही.
But I feel this blog is very apt for that.
No comments:
Post a Comment