Wednesday, 6 December 2017

अंजन

लग्नसराईसाठी म्हणून प्रवासात जरा एक्स्ट्रा काजळ,लायनर असावं म्हणून एका टकाटक ग्लैमरस दुकानात गेले.
चकाचक शेल्फस्, काऊंटर्स..त्याहून चकाचक सेल्स गर्ल्स्. मिठ्ठास हास्याचा गालिचा अंथरणारा गोमटा सिंधी दुकान मालक.
शिडशिडीत, गो-यागोमट्या अनेक मुली, एखाद-दुसरी घारोळी, स्ट्रेटनिंग केलेले केस, झाडून सगळ्या काळ्या वेस्टर्न युनिफॉर्ममधे. लालचुटूक नखं, ओठ, काळ्या रेषांनी ठसठशीतपणे रेखलेले फडफड डोळे, ईयर टू ईयर दातेरी हसू..अगदी अंगावर येणारा बटबटीत थाट.
आईये मैडम..क्या चाहिये ?
इंडियन, इंपोर्टेड सर्व प्रकारचे लायनर्स बघीतले शेवटी नेहमीचाच ब्रशवाला टाईम टेस्टेड लायनर घेतला. काजळ मागीतलं तर ढीगभर पेन्सिलस् दाखवल्या.
ये नही वो छोटावाला चाहिये. हरी डबी..जाई काजल.
वो काजल ?
मी अगदी दाताची मिसरी मागितल्यासारखा चेहरा दचकलेला.
हां..वही छोटी डबीवाला काजल.
एकदम माझं माप नजरेनीच काढत तिरकसपणे..
ऐ सुमन..तेरे काऊंटर पे है क्या वो डबीवाला काजल ?
वो डबीवाला ? नही है.
सॉरी मैडम..We don't have that.
तमाम मुली कमिशनवाला गलेलठ्ठ किमतीचा इंपोर्टेड माल खपवायला अति तत्पर.
दहा-वीस रुपयांच्या वस्तू आणि फुटकळ खरेदी करणारे कस्टमर तर खिजगणतीतही नाही.
दुरस्थ व महाग तेच उत्तम आणि आपलं व स्वस्त ते निरुपयोगी. पण एकूणातच हा फंडा सगळीकडे लागू होतोय हल्ली.
कीती अनेक खोट्या समजूतींवर हा 'फेयर ऐन्ड लव्हलीचा' करोडोंचा डोलारा उभा आहे.
अगदी डोळ्यात अंजन घातलं गेलं.

No comments:

Post a Comment