घ्या नं बाई मटार..लयी हिरवेगार हाईत. साठ रुप्ये किलोंनी विकत्ये, पन तुमच्यासाठी पन्नास नी. घ्या..
माझ्यासाठी का बरं ?
ताई तुम्ही लक्ष्मी आहात.
मी आणि लक्ष्मी ?
मंग सांजच्या पारी लक्ष्मी येती दारी. पाच वाजले की आता. द्या ती पिशवी इकडं. दोन किलो करु ताई शंभराचे ?
भाजी मंडईत हिच्याकडे यायच्या आधी एकाकडे ईडलिंबू बघीतले होते. आयुष्यात पहिल्यांदाच.
उतरलेलं लहान पण लांबट ईडलिंबू शंभरला एक.
जरा रसरशीत असलेलं दोनशेला एक. आणि सगळ्यात मोठं आणि रसदार असलेलं तिनशेला एक.
खरबरीत, पिवळट जाड सालीच्या, लांबट ईडलिंबाचा भाव ऐकूनच इतकी हबकले की चक्क फोटो काढायला पण विसरले. अर्थात विकत नाहीच घेतले.
पण शाळकरी वयातली एक श्वासी, एक चाली खडखड मुळाक्षरं-बाराखडीच आठवली.
भाव ऐकून या जन्मी तरी ई..ईडलिंबूचा विसरणं अशक्य आहे.
ईडलिंबाच्या रेसिपीज कोणी सांगेल काय ?
म्हणजे मग विकत घेता येईल.
No comments:
Post a Comment