कालातीत असे कितीही नैसर्गिक मोसम असू देत. पण त्या त्या सिझनच्या नियमित टाईमटेबल प्रमाणेच आपल्या व्यवसायाची, दिनक्रमाची, राहणीमानाची आखणी करणारे बुध्दीमान मानव आपण.
पण निसर्गाचा एक अवेळीचा झटका आपली पार तारांबळ उडवू शकतो नाही ?
आता कालचच बघा. मुंबईच्या दिशेने ओखा वादळ आलं गुजरातला वळलं पण. पण हवामानात लगेच कीती बदल झाले बघा. या अवचित आलेल्या पावसामुळे, झोंब-या वा-यामुळे, थंडीमुळे जो तो आपापल्या परीने वैतागला,सुखावला.
मीच (टोणगा मगभर)पहिला चहा घ्यायला व्हरांड्यात आले तर खूप गारठा, वारं. अगदी बसवेना.
मनात आलं अरे यार ये माहौल तो सैटरडे-संडे होना चाहिये था. हुरडे का मजा लेने कस्टमर्स तबीयत से आते थे. हल्ली फारशी कहरी थंडीच पडत नाही आणि पडली तरी दोनचार दिवसच. पण पब्लिकला स्वेटर्स,मफलर्स घालून बाहेर पडायला..हु..हु..सुं..सुं...करत थंडी ऐंजॉय करायला फार आवडतं.मग नंतर सर्दी-पडसं झालं तरी हरकत नाही. They just want to go out and enjoy this chilling cold. असा चान्स सहसा कोणीच सोडत नाहीत.
{म्हणजे माझी कालची पोस्ट (बायको म्हणजे ऊन...वगैरे) याच वेळी मला सुचलेली.कोणी विचारो न विचारो मीच सांगून टाकलं बघा तुम्हाला लिखाण कसं सुचतं ते.(नाही म्हणायला लेकीने विचारलं होतं..आई तू हल्ली कशात एवढी गर्क असते गं..फोनंच नसतो तूझा कधी म्हणून !)}
म्हणजे हिरण्यच्या दृष्टीने वादळं,गारवा लवकरच आला म्हणून मला वैताग आला. पण पोष्टीही सुचल्या की हो !ज्यांच्याकडे लग्नकार्य होतं ते पावसामुळे चिंतीत झाले. झोंब-या गारठ्यामुळे वुलन्स विकणा-या तिबेटीयन मार्केटमधे चैतन्याची लहर पसरली. चहा-पकोड्याच्या टप-यांनी जास्तीचा माल बनवून ठेवला. थंड पदार्थांची मिजास मोडीत निघून गरम पदार्थांना तेजी आली. रात्रीचे प्रवास करणारे कमी झाले. दारावरून आरोळ्या देत जाणारे डिंक,मेथ्या,उडीद विक्रेते जास्त सक्रिय झाले. गृहिणींना स्वैपाकाचं वेगळंच स्फुरणं चढलं. भाजीबाजार हुडहुडत का होईना पण अजूनच रसरसला. दिवसभरच्या कोवळ्या,नरम उन्हात बाग वेगळीच बहरल्यासारखी वाटू लागली. दोन दिवसाचं हे पेल्यातलं वादळ . पण त्यामुळे सोशल मिडिया मात्र दुथडी भरून वाहू लागला.
सही में, दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये.
आणि हे सारं घडलं ते साधारण-सौम्य वातावरण बदलामुळे.
आता जिथे दस्तुरखुद्द घमासान वादळच थडकलं तिथे काय गत असेल कोण जाणे ?
गुजरातच्या निवडणुकीच्या धुराळ्याचा तर पार चिखल झाला. दिग्गजांच्या ब-याच सभा कैन्सल झाल्या म्हणे.असो.
गुजरातच्या निवडणुकीचा रिझल्ट काहीही लागो. खापर फोडायला आयतच एक वादळ नमो आणि रागा भक्तांना मिळालं हे मात्र खरं.
आणि आपलंही पोष्टींच दळण निघालं की.
What else you want in life ?
Three cheers for OKHAA !!!
No comments:
Post a Comment