Saturday, 23 December 2017

येणार सून ही या घरी.

हल्ली कुठल्याही लग्नाला गेलं की समवयस्कांच्या गप्पा हल्लीची लग्न, प्रेमविवाह, पाहून विवाह, मुला-मुलींच्या अपेक्षा, लग्नानंतरची वर्तणूक या भोवती फार असतात.😨
एकेकजण स्वतःचे, दुस-यांचे ऐकीव, बघीव, वाचीव अनुभव भरभरून शेयर करतात. 🤔
तर हल्ली गप्पांचा रोख मुलगी देण्याच्या धास्तीपेक्षाही एखादी मुलगी घरात सून म्हणून आणतानाच्या दडपणाचा जास्त आहे.😵

पुर्वी एक म्हण प्रचलित होती..मुलीच्या लग्नासाठी बापाला चपला झिजवाव्या लागतात. हल्ली जरा उलट झालयं आली सुन घरात की सासवांना डबल काम करावं लागून त्याच बिचा-या बारीक होतात.😱
असो. विषय फार गहन आहे, नंतर सविस्तर बोलू.
😷

तर पुर्वी सहसा पंचक्रोशीतल्याच मुली, सूना म्हणून पत्करल्या जात असत. त्यामुळे आसपासच्या गावातील अनेक मुली एकाच शहरात नांदत असत. परत एकमेकांच्या लग्नात गाठीभेटी झाल्या की आपापसातल्या मुली सजेस्ट करुनही परिचितांमधेच लग्न जुळत असत. साहजिकच सासवा भेटल्या की तुझी-माझी सून कुठली आणि कशी अशा कागाळ्या होतच असाव्यात. 😉
तर त्यातूनही काही टाईम टेस्टेड ढोबळ वाक्प्रचार जन्माला येत असतं.

एवढ्यातच नांदेडला लग्नाला जाऊन आले. बहिणींमधे मुला-मुलींच्या लग्नाचा विषय निघालाच. तर माझ्या एका बहिणीने सांगितलेली एक म्हण तुम्हालाही  सांगते.
नांदेड परिसरात अर्काट,कजाग सुनांच्या बाबतीत ही म्हण सर्रास वापरली जाते.🙄
नऊ नांदेडी..
येक उंबरखेडी..
मुळावा कडी.
म्हणजे नांदेडच्या नऊ सूना तर उंबरखेडची एक आणि सर्वात वरताण सून कुठली असेल तर हिंगोली-पुसद परिसरातल्या मुळावा ह्या गावच्या मुली. अत्यंत कजाग आणि भांडकूदळ म्हणून सर्वमान्य होऊन वाक्प्रचारात मानाच स्थान पटकावून बसलेली ही मुळावा कडी.🙏

आमचं नांदेड कंपेरेटिव्हली बरच मवाळ आहे ऐकून हसूच आलं बाई.😀

No comments:

Post a Comment