Thursday, 21 December 2017

गंमत जमंत

आज एकवीस डिसेंबर.
तेवीस डिसेंबर हा वर्षातला सगळ्यात लहान दिवस म्हणून फार कौतुकाचा. तसही हिवाळा कधी येतो आणि कधी संपतो कळतही नाही. उठे उठे पर्यंत सात वाजून जातात. कोवळ्या उन्हाने सकाळचं बाष्पीभवन तर कधी होतं समजतही नाही.
तर काल एका सिख मैत्रीणीशी बोलत होते.  हिवाळ्यातलं खाणं-पिणं, डिंक लाडू, लग्नसराई, घाईचे दिवस असल्या गप्पा मारत होतो. तर बोलण्याच्या ओघात तिने पंजाबी भाषेतले दोन वाक्यप्रयोग ऐकवले.
मार्गशीर्ष आणि पौषातल्या दिनचर्येविषयीचे.
मला ते फारंच भावले.
संपुर्ण भारतभर अशा म्हणी आणि वाक्प्रचारांची रेलचेल आहे. या अशा गोष्टींचा मागोवा घेणं फार इंटरेस्टिंग तर असतंच पण भारताच्या कानाकोपऱ्यातले तमाम भारतीय (एकमेकांच्या भाषा न जाणता देखील) अशा समजुतींनी एकत्रीत बांधलेले असतात, आहेत हे फारचं ह्रद्य वाटतं मला.

# पोह रिद्दी(पकाई) ते माह खाद्दी.
पौषात शिजवलं ते माघात खाल्लं.

# पोह दी दिहाडी, मारा बाऔकर ते बाहरी
पौषात फक्त झाडूपोछाच होऊ शकतो इतका दिवस लहान असतो.

No comments:

Post a Comment