Tuesday, 7 November 2017

उंचे लोग..उंचा दर्द !

पंतप्रधान मोदींनी डिमॉनिटायझेशन करुन वर्ष झालं आहे.मागच्या वर्षी घेतलेल्या या बेधडक निर्णयामुळे उडालेला बराच धुरळा आता खाली बसला आहे.
पण पहिले दोन-चार महिने तर भल्याभल्यांची सैराट अवस्था झाली होती. वैयक्तीकस्तरावर आम्हाला काहीही फरक पडला नाही पण सोशल सर्कलमध्ये वावरताना मात्र या विषयामुळे भरपूर करमणूक झाली. दिवाळी संपली आणि मोदीजींनी खरोखरचाच लक्ष्मी बॉंब फोडला.

ज्यांच्याकडे भरपूर अनअकॉउंटेड पैसा होता त्या पुरुष वर्गाची प्रचंड धावपळ झाली तर महिलांना कुरकुर करत चघळायला एक विषय मिळाला. त्यात कुणाकडे लग्नाची तयारी तर कुणाकडे अजून काही समारंभाची जय्यत तयारी सुरु होती.

ज्यांनी लग्नांचे,समारंभांचे जंगी आणि 'हटके' साजरीकरणाचे जे मनसुबे रचलेले होते ते सगळेच या निर्णयामुळे पार कोसळले. या डिमॉनिटायझेशनच्या तडाख्याचा परिणाम कुठे-कुठे आणि कसा झालाय याची झलक मला एका टोलेजंग लग्नात सहजपणे ऐकायला मिळाली.

ऐन थंडीतलं लग्न. आगमागचे भरपूर कार्यक्रम मी माझ्या नेहमीच्या मैत्रीणींबरोबर एंजॉय केले पण ऐन लग्नाला खूप गर्दी त्यामुळे जशी जागा मिळेल तशी मी एकटीण महिला विंगमधे बसले. हिरण्यमुळे नावाने,
चेह-याने तशा माझ्या भरपूर ओळखी आहेत त्यामुळे उजव्या-डाव्या हाताला एकेकट्या बसलेल्या दोघीही जणी तशा माफक ओळखीच्या निघाल्याच.
दोघीहीजणी धनाढ्य व्यावसायिक कुटुंबातल्या तरी त्यातल्यात्यात माझ्यामते उजव्या हाताची जरा जास्तच उजवी.
मला मधे घेत दोघींच्याही गप्पा रंगल्या. उहा(उजवा हातवाली) कडे लवकरचं मुलाचं लग्न आहे तर डाहा(डावा हातवाली) कडे ऑलरेडी सुन आलेली आहे आणि मागच्याच वर्षी डेस्टिनेशन वेडिंग करुन जावाईपण आलाय. दोघीही श्रीमंत आणि बडेजावी डेस्टिनेशन वेडिंगवाल्या कंपूतल्या.
तर उहाची आपल्या मुलाचं एकदम शानदार आणि 'सबसे हटके' डेस्टिनेशन वेडिंग करायची जय्यत तयारी बहुतांश झाली होती. पण मधेच मोदींनी या असल्या बडेजावी धुमधडाक्यांची वातच काढून टाकली त्यामुळे साहजिकच उहावाली प्रचंड नाराज होती.

दुस-या राज्यातल्या टोलेजंग स्टार हॉटेल मधलं
चार-पाच दिवसाचं दिमाखदार लग्न. उत्तरेकडचा नामांकीत केटरर, दक्षिणेकडचा भारतीय जरतारी कपडा, जडजवाहीर खरेदी तर पश्चिमेकडचे बॉलीवूडफेम संगीत, मनोरंजन करणारे स्टारडमवाले कलाकार...सगळं कीतीतरी आधीच ठरलेलं.
काही गोष्टी तर लोकांना सरप्राईज देऊन डोळे दिपवण्यासाठी चुपचाप ठरवलेल्या. आपल्याकडचं लग्न,आपलं वैभव, नाव कसं त्रिखंडात दुमदुमलं जावं असंच सगळं नियोजन होतं. पण मोदींनी सगळी स्वप्न बेचिराख केली कारण लग्न इतकं तोंडावरच होतं की काही हलायला-डुलायला वेळच हातात नव्हता. सगळ्या ठरलेल्या गोष्टी चुपचाप रद्द करुन थोडक्यात लग्न उरकायची वेळ आली. ठरलेल्या बजेटमधे ऐंशी टक्के कपात करुन गावातच आता जमेल तसं लग्न करावं लागत होतं म्हणून वराची आई प्रचंड नाखूष होती.
हावं ना..एक ही तो बेटा है रे मेरा..इतना सारा प्लैनिंग किया था हमने..ये मोदीने सब चौपट कर दीया.
हम इतने घुमते, इतनी शादियां अटेंड करते तो आपून को भी लगता है न की अपने बेटे की शादी भी शानदार हो जाये. हमने तो पुरे कार्डस भी बांटे थे डेस्टिनेशन वेडिंग के हिसाब से. अब सब खर्चा पानी में गया. लोगोंके एयर टिकटस्, हॉटेल के रुम्स, केटरर्स, ईव्हेंटवाल,बॉलीवूडवाले सबको एडव्हांस दे चुके थे..सब कैंसल करना पडा. मेरा तो मुडहीच गया.
और अपने औरंगाबाद में हैईच क्या ?
एकसाथ दो सौ रुम्स मिलना भी मुष्कील है यहां.
बिस रुम्स इधर, तो चालिस रुम्स उधर..
क्या मजा आयेगा ऐसे शादीका ?
ना यहां ढंग का केटरर है नाही हटके इव्हेंट करनेवाला. ये नोटबंदी सुनकर तो हमारे घरमें मानो तो सन्नाटाही छा गया है.

बिचारी वरमाय !
मनातलं खळखळतं दुःख एका त्रयस्थाकडे व्यक्त करत होती. मुलगा जन्मल्यापासून पाहिलेलं त्याच्या राजेशाही विवाहाच स्वप्न कुवत असूनही पुर्ण करु शकत नव्हती ती माऊली.
अशाच एका बाईंनी एकदा मला ग्रामीण भागातली ड्रायव्हर कम घरकाम करणारी जोडी शोधायला सांगितली होती.(हिरण्यमुळे) 
दारात यजमानबाईंसाठी मर्सिडीज आणि कामं काय करायची तर दळणं आण,भाजी आण असली.
टोलेजंग, अवाढव्य बंगला, प्रशस्त बागबगीचा, टापटीपीचा अवाजवी सोस, प्रतिष्ठितांचा राबता... नोकरांच्या फौजेशिवाय हा डोलारा सांभाळणं केवळ अशक्य. घरात कुमारवयीन मुलं आणि बाईंचा शहरी नौकरांवरचा विश्वास येनकेन पार उडालेला.
कुणाला कशाच्या आणि कीती गहि-या चिंता असतील याची आपल्या कल्पनाही येत नाही.

मग मुलींची झटपट लग्न करुन देण्याकडे चर्चा वळली.
मग मी डाहाला विचारलं तुम्ही मुलीचं इतक्या लवकर का लग्न केलं ?
अरे छोटी कहां ? ग्रेज्युयेट तो हुवी थी ना ? अच्छा रिश्ता आया कर दी शादी.
लेकीन लडकीया तय्यार होती है क्या जल्दी शादी करने को ?
हां..क्युं नही. अपने मा बाप अपनी भलाईकाही सोचेंगे ये समझता है ना उनको. और हमारी लडकीयां तो मानतीही है.
मग विषय वळला तो घरात आलेल्या सुना आणि त्यांच्या आईवडीलांचा मुलीच्या सासरच्या घरात नको इतक्या इंटरफियरन्सकडे.
मोठाल्या टोलेजंग घराचे जे अनेक तोटे आहेत त्यातला हा एक. दोन-तिन मजली घरं..आपापल्या स्वयंपूर्ण खोल्या. सुना बाहेरच येत नाहीत. टिव्ही,फोन असतोच मन रिझवायला. माहेरी कधी आणि कीतीवेळा बोलतात आणि काय-काय शेयर करतात याचा फार धाक असतो म्हणे या नुतन सासवांना.

मला मधे घेऊन दोघीही जणी एकमेकींशी मनमोकळं बोलत होत्या. म्हणजे पैसा असो वा नसो, चिंता संपत नाहीत हेच खरं.
गरीबांना साधारणतः वाटतं पैसा असला की सगळी दुःख संपतात.पण तसं होत नाही. पैसेवाल्यांकडेही भरजरी वस्त्रात का होत नाही पण दुःख हजरच असतं.

उंचे लोग,उंचा दर्द.

No comments:

Post a Comment