Thursday, 26 October 2017

लक्ष्म्या फिरती दारोदारी.
कुठल्याही अमावस्येला काही ठराविक जातीच्या महिला सकाळी सकाळी घरोघर फिरुन दे गं माय अमावस्या.. आमावस्या वाढा हो बाई..असे हाकारे देत शिधा आणि तेल मागतात म्हणे. अशा हाका एवढ्यातच बरेचदा ऐकल्या आहेत.काही शेजारणींना या बायकांना काही देतांनाही पाहिलं आहे पण आज पर्यंत कुणाला या विषयी विचारलं नव्हतं.
तर आज फिरायला बाहेर पडले.रेल्वेपुलावरुन चालू लागले तर खालून काही महिला डोक्यावर थोरलं टोपलं घेऊन आणि मुलं/मुली (खोद्यावरची,हात धरलेली,मागे पळत येणारी आणि डोक्यावर टोपलं घेऊन तडफेनं चालणारी) अत्यंत झपाट्याने चालत होती.मोबाईल काढेस्तवर दिसेनाशी झाली.अरेच्या बहुदा स्टिलचा कैन होता त्या टोपल्यात.ह्या अमावस्या मागणा-या बाया तर नव्हेत ? एवढ्यात अजून तिघी-चौघी तशाच तरातरा चालत गेल्या. एखाद्या वसाहतीतून एक टोळीच बाहेर पडली आहे वाटतं. किडकिडीत सावळ्या महिला,
काहींच्या बखोट्याला मुलं,काही मुलांच्या डोक्यावरही सामानासह टोपलं..आणि सगळेच एकाच दिशेला,एक कतारसे तरातरा निघालेले.
जेमतेम सात वाजताहेत सकाळचे.आणि खोपट्यातल्या गृहिणीयोग्य प्राथमिक गोष्टी आटोपून मुलाबाळांसह या महिला घराबाहेर देखील पडलेल्या.तरीसुद्धा आवेश उशीर झाल्यासारखाचं.
सध्या सकाळी फिरणा-यांची संख्या अगदी रोडावली आहे. सण,मेजवान्या,पाहुणे.. Disciplined people like to pamper themselves like this way once in a while.पण अस्मादीकांचे डोळे हल्ली लवकर उघडताहेत.कुटुंबही निद्राधीन असतयं आणि कुठे पहाटेच त्या फेसबूकवर पडायच म्हणून मी तर आवर्जून बाहेर पडतेय.अजूनही एक कारण आहे पण may be my next post will be about that.
तर कुठे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वजनाच्या धाकाने बाहेर पडणारी मी आणि अशाच इतरही आणि कुठे या आजच्या सणी अमावस्येला विशेष दानाच्या अभिलाषेने बाहेर पडणा-या महिला ?
भर सणावारी समाजातील विशिष्ट घरच्या लक्ष्म्यांवर अशी दारोदार फिरुन तेल-शिधा जमा करायची वेळ येतेय ! खरोखर वाईट तर वाटलंच पण मी स्वतः किती एका सामाजिक रचने विषयी,रिवाजा विषयी अनभिज्ञ कशी काय राहिले याचाही खेद वाटला.
इतकं असोशीने कुणी दारी दान-भिक्षा मागत येतय तर आपणही काहीतरी मदत केलीच पाहिजे हे प्रकर्षाने जाणवलं.

No comments:

Post a Comment