रविवारची भली पहाट.पावसाळी हवा.परिसर शांत. तरीपण दुरुन कुणाचा तरी गाण्याचा,चिपळ्यांचा खडा आवाज येतोय.आवाज हळूहळू जवळ येत चाललाय. नक्कीच गल्लीत कोणीतरी अभंग गात शिरलय.खाली जाऊन पाहिलं तर खणखणीत आवाजात गाण्यातून दान मागत निटनेटक्या शुभ्र कपड्यातला वासुदेव जात होता. त्याचा पाठमोराच व्हिडिओ घेतला.
परत पाच मिनिटांनी दुस-या चालीतला अभंग गात भरजरी पितांबरी कपड्यातला, झकपक वेषातला दुसरा वासुदेव दारावरनं गेला. त्याचाही व्हिडीओ घेतला. मी त्यांचे फोटो घेत आहे हे त्यांनी पाहिल्यामुळे परतताना आमच्या दारावर ते आवर्जून थांबले. आपण इतके फोटो बिनदिक्कत काढले याची माझ्याही मनाला टोचणी लागली त्यामुळे दोघांनाही पैसे दिले.त्यांनीच चहाचा विषय काढला मग चहासाठीही बसायला सांगितलं.चहा आणून दिला की पितांब-याने माझी ठोकताळी भविष्यवाणी सांगायला अशी काही सुरवात केली की बास !
ताई तुम्ही अशा-तशा, तुमचं अस्स आणि तस्स.
सगळे पहिल्या इंप्रेशनचे अंदाजीच पण ख-याजवळ जातीलसे वाटणारे 'हमखास यशस्वी' ठोकताळे.
ताई तुम्ही मनाच ऐकता.कष्टाळू आहात.तुमचे आता सुखाचे दिवस आहेत.पुर्वज कमाईपेक्षाही तुम्ही स्वतःच्या हिमतीने वर आलात.सगळं स्वनिर्मित आहे.लोकं तुमचं कौतुक करतात.तरी काही जण वाईटावर आहेत.त्यांना तुमचं चांगल बघवत नाही.एका बाईची नजर वाईट आहे तुमच्यावर.पण तुम्ही मनानी चांगल्या आहात.दुस-यांच चांगलच करता.चांगलच बघता.परमेश्वराने खूप दिलय तुम्हाला. तरी ती वाईट नजर कमी करा ती.तुम्हीना चार नारळं आणि काहीतरी (काय सांगितलं आता आठवत नाही) औदुंबराखाली ठेवा.तिथे दत्ताचा वास असतो वगैरे...वगैरे.
गडी अगदी चहा घ्या म्हणायचीही मिनिटभर उसंत देईना.धवल वासुदेवही वैतागला. कसेबसे चार घोट चहाचे घेतले की 'वाईट नजरेच्या' विलाजावर गाडी परत वळाली.हे करा ते करा.कागद-पेन द्या.मी सांगतो ते करा.मी बधत नाहीये असं दिसलं की मुलांच्या चौकश्या. नव-याची तब्येत असे वयाच्या अंदाजावरची टिपणं.
म्हटलं काही नको. मग मीच चौकश्या केल्या त्यांच्या. आणि आवरतं घेतलं.बारामतीकडची माणसं.त्यांचे पुर्वज इकडे यायचे म्हणून हेही या दिवसात इकडे फिरतात नसता गावी शेती करतात.
शुभ्र वासुदेवालाही निघायची घाई होती.तरी हा पितांबरी आडूनपाडून विलाजाची खिंड चिकाटीने लढवतच होता. माझ्या निग्रहापुढे त्याचाही काही विलाज चालेना.हुश्य..शेवटी निघाले.
पण निघतानाच्या त्या पितांबरी वासुदेवाच्या ताई..तुमच्या मुलाचा एखादा जुना ड्रेस असेल तर द्याना मला घालायला या अगतिग मागणीने अक्षरशः गलबलून आलं.पण एकूणच ही भल्या सकाळची संवाद-भेट लांबवण्यात मला मुळीच रस राहिला नव्हता म्हणून तसेच वाटेला लावले या वासुदेवाला.
पण नंतर मात्र माझंच वागणं मला कितीतरी वेळ बोचत राहिलं. एका भरजरी लोकप्रिय सोंगाच्या मागची अत्यंत प्राथमिक संसारी व्यथा काळीज कुरतडून गेली.

No comments:
Post a Comment