फार्म हाऊस बनवायचं म्हणून जमीन घेतली.नंतर त्याच्या जमिनी झाल्या.मग काहीतरी कमर्शियल व्यवसाय करायचा म्हणून हिरण्य सुरु केलं.
दोन एक वर्षात हिवाळी 'हिरण्य हुरडा फेस्टिव्हल' सुरु केला आणि त्याकाळापुरता तरी छान जम बसला.
पण वर्षभर लोकांना आकर्षित करायला काहीतरी शक्कल लढवणं भाग होतं.त्याचीच परिणीती होळी साजरी करण्यात झाली.ऊन्हाळा तर तेव्हा तरी फारच वैराण असायचा.पण पावसाळ्यात हिरण्यचा डोंगर-तलावाचा परिसर निसर्गतःच सुंदर आणि रमणीय होत असे तेव्हाही.
मग लोकप्रिय 'हिरण्य हुरडा' सारखीच 'हिरण्य धुवांधार' अशी चपखल जाहिरात पावसाळ्यात केली.
लोकांमधे या धुवांधार शब्दाने इतकी उत्सुकता जागृत केली की लोकं फोन करुन विचारायचे हे धुवांधार काय म्हणून.मग आम्ही त्यांना हिरण्यला येऊन पावसात भिजायची,भिजत चहा-पकोडे खायची, निसर्गात रमायची कल्पना सांगायचो.मग ते विचारायचे आणि पाऊस नाही आला तर ?
मग धबधबा आहेच ना !
रिसॉर्टमधे येऊन पावसात कुटुंबासह,मित्रपरिवारासह भिजायचं,जेवणाचा आनंद घ्यायचा,हिरव्याकंच आणि ओलेत्या निसर्गात तुडुंब रमायची कल्पना औरंगाबादकरांमधे रुजवायला आम्हाला दोन-तिन पावसाळे वाट बघावी लागली.
पाऊस आला तर काय म्हणणारे आता पाऊस नाही आला तर भिजायची काय सोय आहे असं म्हणायला लागले.
अजूनही काही जणं त्या 'हिरण्य धुवांधार'ची आवर्जून आठवण करतात.
तर आज खरोखरच धुवांधार पाऊस होत आहे म्हणून हे सगळं आठवलं.
No comments:
Post a Comment