Tuesday, 26 September 2017

जीवन साखळी.

रात्रीच कधीतरी गतप्राण झालेल्या हेलिकॉप्टरला फोटोसाठी उन्हात ठेवलं.बरेच फोटो काढले.एखादा पोस्ट केला.दरम्यान दोनेक तास गेले असावेत.परत बघते तर हेलिकॉप्टरच्या हलक्या देहाचा लाल मुंग्यांनी चहूबाजूंनी ताबा घेतलेला.आसपास शेकड्यांनी मुंग्या होत्या तरीपण अजूनही शिस्तीत, लाईनीत झुंडी येतच आहेत.
अवचितपणे उपलब्ध झालेल्या अन्नाचा वास कसा या यत्किंचत जीवाला जात असेल कळत नाही.बरं एक नाही,दोन नाही हजारो मुंग्या काही मिनिटात कुठून अवतिर्ण झाल्या तेही कळलं नाही.
वेळ दिला असता तर काही मिनिटात तो देह खोकला करुन दहावीसजणींनी वाहूनही नेला असता इच्छित स्थळी.
निसर्गसाखळीची कमाल आहे.जसे सहजपणे एकटे जन्माला येतात तसेच सहजपणे एकटे (कल्याणकारीपणे)विरुनही जातात.
नाहीतर आपण ?
काय ते निधनाच अवडंबर.कलेवराचे विधी.
त्यातही धर्मनिहाय,जातीनिहायचे अवडंबरीअट्टाहास.
कलेवरावरचे संस्कार, दहनाचे-दफनाचे प्रकार, त्यासाठीचे गर्दीचे लोट,त्याच्यातही बढाया-मोठेपणा, राजकारण-समारंभ,भाषणबाजी,
तुमचं-आमचं वादभेद,गोडजेवणं..
अरारा...सुखासुखी मरणही अवघड आणि मरणोपरांतही समजूतदारपणे माती होणं-होऊ देणं नाहीच.
काहींची तर फार विटंबना होते पैशासाठी,संशयामुळे.
आता तर देहदानामुळे अजूनच एक नवीन वादाचा मुद्दा निर्माण झाला आहे.
मरणा-याने समजून-उमजून देहदानाचा फॉर्म आधीच भरुन ठेवलेला असतो.जवळच्या व्यक्तीला सांगूनही ठेवलेलं असतं.पण मरणोत्तर नक्की काय केलं जाईल याचा भरवसाच नसतो.कोण कुठला धर्माचा-कर्माचा-गोत्राचा पाईक उठेल आणि कुठला भावनिक फतवा काढेल याचा नेम नसतो.
जीत्या आयुष्याचीच काय मरणोत्तरही हिडीस विटंबना केली जाते मानवांची.जसं म्हणतात कुणाच्याही घराची स्वच्छता बघायची असेल तर त्या घरचा संडास बघावा.तसच काहीसं कुणाचा सुसंस्कृतपणा बघायचा असेल तर त्यांच्या कडच्या या मयतक्रिया बघाव्यात.
अविवाहित, घटस्फोटीत, विधवा,निपुत्रिक स्त्रियांची,
दलितांची,दुर्बलांची फार अमानुष अवहेलना केली जाते या वेळी.. तेही हायली इव्हॉल्व्ड विचारी, बुध्दीजीवी, भावनाप्रधान मानवाकडूनच.
We have made living as well death also very,very complicated.
Actually death is the most enterprising and mysterious surity of life !
पण आपणच आपलं इतकं अवाजवी महत्व(?) वाढवून ठेवलं आहे ना की we have forgotten that first and foremost we are the mare biological creatures of this planet.
Anyway..कलेवर नष्ट करायची कोणती पद्धत जास्त सुयोग्य असावी बरं ?
धर्मांचा,इतिहासाचा अभ्यास करताना,आसपास वावरताना असा प्रश्न नेहमीच पडतो.
आधी वाटायचं जमीनीत दफन करणे फारच छान.
शरीराचं ख-या अर्थाने मातीत मिसळून जाणं कधीही उत्तमच.पण वाढत्या लोकसंख्येच्या प्रदेशात  वसाहतीपासच्या जमीनी मोकळ्या मिळणं मुश्कील आणि परत काही काळ तरी जमीनीखालचं कलेवर सांभाळायची जबाबदारीच नाही का ?
त्यापेक्षा निसर्गाशी हातमिळवणी करत झटपट दहन जास्त संयुक्तिक वाटतय हल्ली.
अवयवदान,देहदान तर फारच उत्तम पण त्यालाही काही मर्यादा आहेत.
राखणदारीच्या दो गज जमीनीपेक्षा दो हंडे राख सोपी निस्तरायला.
कुठून कुठे भरकटले बघा ?

No comments:

Post a Comment