आमच्या एका स्टाफचं अचानक मिसकैरेज झालं.तातडीने औरंगाबादच्या नामांकित सरकारी दवाखान्यात जावं लागलं.
आम्ही सत्तरच्या दशकात औरंगाबादला रहायला आलो तेव्हा हे हॉस्पिटल(घाटी) अत्यंत नावाजलेलं व सर्व सुविधांनी युक्त होते.त्यामुळे माझ्या सर्वात लहान भावाचा जन्म इथेच झालेला.तसेच माझ्या आजीच्या ट्यूमरसाठीही आम्ही इथे दिर्घ काळ यायचो.मग मधे ब-याच वर्षांचा खंड पडला.पण एक साताठ वर्षांपूर्वी आमच्या हिरण्यच्याच स्टाफला साप चावला म्हणून इमर्जन्सी वॉर्डमधे जाऊन आले होते तेवढेच.
तर मागच्या आठवड्यात कैक वर्षांनंतर गायनैक वॉर्डात जायची वेळ आली. मोठी इमारत. त्यातच ऐसपैस एकेक वॉर्डस आमनेसामने. सुरवातीलाच अपघात विभाग.दोन तीन ऐंब्युलंस उभ्या. चिंताक्रांत नातलग कोंडाळ करुन चर्चाग्रस्त.तळमजल्याचा अख्खा कॉरीडॉर नातलग पुरुष-स्त्रियांनी काबीज केलेला.
अस्वस्थता आणि अस्वच्छतेच राज्य. तशीच वाट काढत आणि फोटो काढण्याचा मोह आवरत पुढे गेले. सर्वसामान्यांच्या हतबलतेेेचं पोस्टीरुप भाांडवल करावसं वाटलं नाही

दुुुस-या मजल्यावर गायनैक विभाग. कॉरीडॉरच्या उजव्या हाताला नॉर्मल डिलेव्हरीचा वॉर्ड तर त्या समोरच डाव्या हाताला सिझेरियन पेशंटसचा वॉर्ड.बाहेर तरुण,वयस्क पुरुष ताटकळून उभे.चपलांचा ढिग.कोंदट हवा.महिलांचा दबका गलका.जेवणाची वेळ.त्यामुळे पुरुषांना आत प्रवेश.एखाद्या प्लॉटच्या साईझचा वॉर्ड.एकापाठी एक अशा तीस-पस्तीस पलंगांनी,सलाईन स्डैंसनी गच्च भरलेला.दोन पलंगामधल्या यायच्या-जायच्या रस्त्यातही खाली गाद्या घातलेल्या.एक ते सात दिवसापुर्वी सिझेरियन झालेल्या तरुण मुलींनी व बहुतेकांच्या कुशीतल्या बाळजीवांनी वॉर्ड गजबजलेला.काही जणी म्लान होऊन झोपलेल्या तर काही बाळांचा टाहो.
नजर टाकू तिथे बाळांतीणी,त्यांच्या कुशीतले कौतुकाचे-बिन कौतुकाचे पुरुष-स्री जातीची गोजिरवाणी बाळं आणि रुग्णांना भेटायला आलेले,जेवण घेऊन आलेले त्यांचे महिला नातलग,नवरे.कोप-यात तरुण डॉक्टर्स आणि चटपटीत नर्सेसचा डेरा.
वॉर्डच्या आतला कॉरीडॉरही दोन्ही बाजूच्या पलंगांनी,गाद्यांनी भरलेला.
इतक्या जमीनीलगतच झोपलेली ती सुकोमल बाळं आणि सुकुमार बाळांतीणी बघून अक्षरशः वाट काढत चालावसं वाटत नव्हतं.

पण नाईलाज होता.खेड्यापाड्यातून आलेल्या महिला.खूप जणींबरोबर तर नव-या शिवाय कुणीच नसतं.मग एखाद्या शेजारणीची अनुभवी आई-मावशी,अम्मी-चाची मदत करणार.रडणारं बाळ सांभाळणार,हाताला धरुन बाथरुमला नेणार. धीर देत घासातला घास देत वेळ आणि माणुसकी साजरी करणार.अगदी ह्रद्य आणि आशादायी दृश्य.
या इमारतीत शिरतानाच मला भुतकाळ आठवत होता.तो हे माणूसकीच दृश्य बघून अजूनच तिव्रतेने आठवू लागला.
माझा सगळ्यात धाकटा भाऊ इथे जन्मला. आईला दवाखान्यात आणणं वगैरे काही आठवत नाही पण मी आणि माझी बहिण बहूदा बाबांबरोबर दवाखान्यात आलो कि आधी लिफ्टकडे पळायचो.मला वाटतं नुकतीच तिथे लिफ्ट बसली होती आणि आमच्या आयुष्यातली पहिली लिफ्ट आम्ही तिथेच पाहिली.त्यामुळे इतकी अपुर्वाई होती आम्हाला त्या लिफ्टची कि बस.म्हणजे आई-बाळाला भेटायला-बघायला यायच्या ऐवजी लिफ्टच्या चकरांच्या ओढीनेच आम्ही दवाखान्यात यायचो. त्या काळी लिफ्ट अटेंडंट असायचा. मग तो आम्हाला सारखं लिफ्टमधून ये-जा करता म्हणून रागवायचा.
आईचा दवाखान्यातला मुक्काम जरा एका छोट्या ऑपरेशनमुळे वाढला. घरात बाबा,आम्ही तिन भावंड,आईची पंगू आई,वयस्क वडील आणि एक चुलत भाऊ एवढे लोक होते.पण धडपड फक्त बाबाच करु शकत होते.त्यांचीही नोकरी.साहजिकच दवाखान्यात दिवसभर कुणीच नसायच तिच्या सोबत.(आज ही अशक्य गोष्ट वाटते)
पण तिला डबल शेयरींगची स्पेशल रुम होती.आईचं चौथ बाळांतपण तर त्या शेजारीण बाईंच पहिलं.आईला मुलगा झाला तर तीन-चार दिवसांनी त्यांना मुलगी झाली. ऑपरेशनमुळे आईला हालचाल करता यायची नाही,बाळाला घेता यायच नाही तर या पहिलटकरीण बाई माझ्या भावाला सांभाळायच्या,आईला काही मदत लागली तर करायच्या.
आईचे मातृत्वाचे अनुभवीपण आणि त्यांच आईला दवाखान्यात समजून उमजून मदत करणं..दोघींचीही लगेच मैत्री झाली.पुढे जीवाभावाचीही झाली. या एका कारणानी आम्ही दोन्ही कुटुंब कायमचे एका मैत्रीच्या नात्यात सर्वार्थाने फार ह्रद्यपणे कायमचे गुंफले गेलो.

त्यामुळे सरकारी दवाखान्यातलं हे आजचं गजबजाटी दृश्य बघून मनात जरी कालवा कालव झाली तरी अजूनही जात-पात-धर्मा बाहेरचा माणुसकीचा झरा अजूनही वाहतोच आहे हे बघून दिलासाही मिळाला.
No comments:
Post a Comment